- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपूर समाचार : भानेगावात संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा

भानेगावात अवतरली पंढरी गण गण गणात बोते च्या मंत्राने दुमदुमले भानेगाव

नागपूर समाचार : शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज प्रकटदिनाची तयारी तालुक्यातील शहर व गावात जोरात करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे १४६ व्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. वार्ड क्रमांक 3, शिक्षक वसाहत, भानेगाव येथील देवेंद्र सोनटक्के यांचा निवास्थानी गजानन महाराज प्रकट दिन उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.

सकाळी श्री चे स्नान, आरती, नैवेद्य श्री गजानन महाराजांना दाखविणत आला तसेच रविवारच्या दुपारी विविध धार्मिक कार्यक्रम भजन, पूजन करण्यात आले व सायंकाळी 6:00 वाजता आरती करून महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला. याप्रसंगी मंदाकिनीबाई सोनटक्के, देवेंद्र सोनटक्के, शितल सोनटक्के, राजू सोनटक्के, सुधाकर कडू, वरिष्ठ पत्रकार दिलीप येवले, सचिन निबांळकर, गुणवंता साहारे, अजय येवले, प्रविण ढोके आदी गजानन महाराज मित्र परिवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *