- Breaking News, नागपुर समाचार, स्वास्थ 

नागपूर समाचार : दोन बूंद जिंदगी के पल्स पोलिओला खापरखेड्यात उत्तम प्रतिसाद

नागपूर समाचार : रविवारी खापरखेडा येथे पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आलेली होती. ज्या अंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना पोलिओ डोस देण्यात आला. दो बुंद जिंदगी के या संकल्पने वर आधारीत किड्स कँम्पस नर्सरी स्कूल खापरखेडा येथे सकाळ पासून चिमुकल्यांना पल्स पोलिओ डोस देण्यात आला.

याप्रसंगी खापरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैदकीय अधिकारी जयश्री पेटकर, आरोग्य सेवक गौतम खोब्रागडे, खापरखेडा किड्स कँम्पस नर्सरीच्या प्रिंसिपल वैशाली शेंन्डे, वरिष्ठ पत्रकार दिलीप येवले, पदमाकर शेंन्डे आदी उपस्थित होते. वरिष्ठ पत्रकार दिलीप येवले यांनी पल्स पोलिओ मोहिम ठिक ठिकाणी राबविण्यात यावी तसेच कोणीही बालक पल्स पोलिओ पासून वंचित राहू नये असे मोलाचे मार्गदर्शन करून गावात जन जागृती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *