- Breaking News, नागपुर समाचार, बाजार

नागपूर समाचार : ‘व्हिजनरीज् ऑफ विदर्भ’ चे थाटात प्रकाशन 

नागपूर समाचार : विदर्भाच्‍या मातीत उद्योग सुरू करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणा-या व विदर्भाचे नाव मोठे करणा-या ‘व्हिजनरीज् ऑफ विदर्भ’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन समारोपीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

‘व्हिजनरीज् ऑफ विदर्भ’ मध्‍ये विदर्भातील 35 आघाडीचे उद्योजक, व्यावसायिकांच्‍या तसेच, 5 स्टार्टअप्स यांच्‍या यशोगाथांचा समावेश करण्‍यात आला आहे. यात नागपुरातील विको, सोलर इंडस्ट्रीज, हल्दीराम, बैद्यनाथ, इन्फोसेप्ट यासह ग्रामहित, टीसेकंड सारख्या स्टार्टअप्सचाही समावेश आहे. याशिवाय, विदर्भातील अन्य जिल्हे जसे अकोला येथील पडगीलवार इंडस्ट्रीज, रुहाटिया ग्रुप, मलकापूर येथील चैतन्य ग्रुप, खामगाव येथील विकमशी फॅब्रिक, अमरावती येथील प्लास्टी -सर्ज इंडस्ट्री, चंद्रपूरचे मल्टिऑर्गनिक्स; यवतमाळ चे ग्रामहित अश्या उद्योगांच्‍या यशोगाथा वाचायला म‍ि‍ळतील. या सर्व उद्योजकांचा नितीन गडकरी यांच्‍या हस्‍त सत्‍कार करण्‍यात आला. कॉफी टेबल बुक संदर्भात डॉ. विजय शर्मा यांनी माहिती दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *