- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : स्पर्धांतून मुलांच्‍या सुप्त गुणांना वाव मिळतो – कांचन गडकरी

आंतरशालेय बालकला महोत्‍सवाचा थाटात समारोप 

नागपूर समाचार : शाळांमध्ये मुलांना खेळ आणि विविध कला शिकविल्या जातात. मुलांसाठी अशा प्रकारच्‍या स्पर्धा आयोज‍ित केल्‍यास त्‍यांच्‍यातील सुप्त गुणांना वाव मिळतो. यातूनच पुढे जाऊन साहित्यिक, गायक, कलाकार घडतात, असे मत संस्‍कार भारतीच्‍या अध्‍यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी व्‍यक्‍त केले.

बाल कला अकादमी, स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ आणि माय सायन्स लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोज‍ित आंतरशालेय बालकला महोत्सवाच्‍या समारोपप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. नंदनवन येथील महिला महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, प्रमुख अतिथी लेखक प्रणव हळदे, वर्षा भावे यांची उपस्थित होती.

सकाळच्‍या सत्रात विविध स्‍पर्धांच्‍या अंतिम फेरी पार पडल्‍या. कलांगण प्रस्तुत व विद्याधर गोखले लिखित, वर्षा भावे दिग्दर्शित ‘फुलवा मधुर बहार’ हे बालनाट्य सादर करण्‍यात आले. सायंकाळच्‍या सत्रात स्‍पर्धांमधील विजेत्‍यांना पारितोषिक वितरीत करण्‍यात आले. कार्यक्रमाचे बाल कला अकादमीच्‍या अध्‍यक्ष मधुरा गडकरी यांनी प्रास्‍ताविक केले. सीमा फडणवीस, धनंजय बालपांडे, कीर्ती बालपांडे, तस्मीम खान, माया पोटभरे, आदित्य सावरकर आदींचा कार्यक्रमात सहभाग होता. 

विविध स्पर्धांचे निकाल….

एकल गायन स्पर्धा : गट अ- प्रथम प्रज्ञेश सोनकुसरे, द्वितीय स्वरदा जवादे, तृतीय ऋत्विक भांडेकर, उत्तेजनार्थ रूद्र कळंबे.

गट ब- प्रथम धनश्री खापरे, द्वितीय गौरी सातपुते, तृतीय सावी तेलंग, प्रणव मोहरे उत्तेजनार्थ.

नृत्य स्पर्धा : गट अ- प्रथम आराध्या कोल्हे, द्वितीय मधुरा मेहर, तृतीय रिया नागडिया, उत्तेजनार्थ मेहुल गुप्ता.

गट ब- प्रथम अनन्या जोशी, द्वितीय निधी पात्रीकर, तृतीय मिहिका शहा, उत्तेजनार्थ मनस्वी भेंडे.

विज्ञान प्रदर्शन : गट अ- जवाहर गुरुकुलचे हर्ष उमरेडकर, आश्लेषा वहांदे प्रथम, एम. के. एच. संचेती शाळेची तिशा मेश्राम द्वितीय, स्कूल ऑफ स्कॉलर्सची आदिती खोडे तृतीय.

गट ब- संचेती शाळेचे सौजन्य सूर्यवंशी, शर्वरी लांचेवार प्रथम, तिरपुडे सेंट्रल स्कूलचा गोविंद भिसीकर द्वितीय, भाऊजी दप्तरी शाळेचे कुश कुंभारे, मोहित हेडाऊ तृतीय.

गट क- श्री दयारामजी वाडे स्कूलचे अपूर्वा बावने, इशिका धकाते, कीड्स वर्ल्ड स्कूलचे हर्मन शेख, भार्गवी चिकाटे द्वितीय, जवाहर गुरुकुलचे प्रेम मेहर व मंथन हटवार तृतीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *