- Breaking News, नागपुर समाचार, शीत सत्र २०२३

नागपूर समाचार : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ ते २० डिसेंबरपर्यंत नागपुरात होणार

नागपुर समाचार : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरु होणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आणि विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अधिवेशनातल्या कामकाजाबद्दल चर्चा झाली.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, मंत्री, आणि दोन्ही सभागृहाचे सदस्य उपस्थित होते. अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार असून त्यात प्रत्यक्ष कामकाजाचे १० दिवस असतील. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची पुढची बैठक येत्या १९ डिसेंबरला नागपूर इथं होईल.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *