- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृहाच्या जागेचा प्रस्ताव शासनस्तरावर मंजूरीसाठी पाठविण्यात येईल – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नागपूर समाचार  : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन अंबाझरी तलावाच्या जवळ असलेली शासकीय जागेचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात येईल. त्यास मान्यता मिळताच लवकरच अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह, आदिवासी मुलींचे वसतिगृह व इनडोअर क्रीडा संकुल बांधण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृहाबाबत बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव राजू हिवसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अ.अ. कुचेवार, तहसीलदार सिमा गजभिये, संजय बाहेकर तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

ही शासकीय जागा दक्षिण-पश्चिम नागपूर क्षेत्रात येत असल्याने त्याबाबत उपमुख्यमंत्री यांचेशी चर्चा करुनच त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. 

5 एकर शासकीय जागेत ही तीनही इमारती मान्यता मिळल्यानंतर बांधण्यात येईल. अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहासाठी यातील 1800 स्वेअर मीटर जमीन विद्यापीठाकडे वर्ग करुन त्यावर सुसज्ज असे वसतिगृह बांधण्यात येईल. सोबतच आदिवासी मुलींचे वसतिगृह व इनडोअर क्रीडा संकुल बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *