- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

हिंगणघाट समाचार : मिसाबंदीचा सत्कार करीत आ. कुणावार यांनी व्यक्त केली कृतज्ञता

हिंगणघाट समाचार : आणीबाणीच्या काळात भाजपाच्या तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची तत्कालीन शासनातर्फे मुस्कटदाबी करण्यात आली, अनेकांना यावेळी मीसा अंतर्गत अटक करीत जेलमध्ये सुद्धा डांबण्यात आले, राष्ट्रहितासाठी आणीबाणी काळात कारावास भोगणाऱ्या या मीसाबंदींचा आज दि.२६ रोजी आ. समीर कूणावार यांचे जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते सत्कार करीत त्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी केलेल्या प्रशंसनीय कामगिरीसाठी कृतज्ञता व्यक्त करीत आमदार समीर कूणावार यांच्या संकल्पनेतून त्यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या कुटुंबीयांची व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता राष्ट्रहितासाठी करणाऱ्या या कार्यकर्त्यांचा समाज ऋणी राहील, असे प्रतिपादन आमदार कुणावार यांनी यावेळी केले.

यावेळी विधानसभा क्षेत्रातील विठ्ठलराव कोल्हे पोहणा, मोहन जगताप हिवरा, रत्नाकरराव ढोबळे मनसावळी इत्यादींचा हृद्यसत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आयोजित सत्कार सोहळ्यात आमदार समीर कुणावार यांचेसह भाजप जिल्हा महामंत्री किशोर दिघे, माजी पंचायत समिती सभापती गंगाधरराव कोल्हे, समाजसेवक रवी रोहणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *