- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

नागपूर/सेलु समाचार : वादळी पावसामुळे घरावरची छप्परे उडाल्याने ४० कुटुंबांचे नुकसान

आ. कुणावार यांनी स्वतः दिली अन्नधान्यासह टिनाची मदत

नागपूर/सेलू समाचार : विधानसभा क्षेत्रातील सेलू तालुक्यातील सिंधी रेल्वे येथे पावसासह आलेल्या वादळी वाऱ्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंदी येथील येथील जवळपास ४० घराचे छप्पर उडाले तर नजीकच्या पळसगाव (बाई) येथील काही झोपडीवजा घरांचेही असून गरीब शेतमजूर, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

काल दि.12 रोजी सायंकाळी 4 वाजताचे दरम्यान झालेल्या सोसाट्याच्या वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांना कळताच आज दिनांक 13 जून रोजी त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांसह सिंदी (रेल्वे) येथे भेट देऊन पाहणी केली.

या नैसर्गिक आपत्तीमुळे संकटामुळे अनेक परिवार रस्त्यावर आले, पडझडीमुळे घरातील अन्नधान्याची ही नासधूस झाली, अशावेळी विधानसभाक्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी घटनास्थळी पोहोचून त्यांना धीर दिला, एवढेच नव्हे तर ज्यांच्या छपरावरील टीना उडाल्या त्यांना घर उभारण्यासाठी स्वतः टीना, लोखंडी अँगल विकत घेऊन दिल्या, अन्नधान्याची नासाडी झाल्याने गहू तांदूळ व शिधाही पूरविला, यावेळी सींदी तसेच पळसगाव (बाई) येथील नुकसानग्रस्त नागरिकांनीही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या दानशूर लोकप्रतिनिधीचे मनोमन आभार मानले.

सदर भेटीच्या वेळी सेलू तालुक्याचे तहसीलदार डॉ. स्वप्निल सोनवणे यांना तात्काळ सर्वेक्षण करून प्रशासनातर्फे योग्य ती मदत देण्याचे निर्देश आमदार कूणावार यांनी दिले. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री किशोर दिघे, सेलू तालुक्यातील नायब तहसीलदार मधुकर ठाकरे, मंडळ अधिकारी श्री चंदनखेडे, महावितरणचे श्री खोडे, अधीक्षक अभियंता स्वप्नील गोतमारे, माजी नगरसेविका अजया साखळे, सरपंच धीरज लेंडे, भाजपा शहराध्यक्ष ओमप्रकाश राठी, सामाजिक कार्यकर्ते अमोल सोनटक्के,स्नेहल कलोडे, श्री दांडेकर,गणेश काळबांडे, सुधाकर घवघवे, मोहम्मद इम्रान, पंकज पराते, प्रवीण शिरसेकर, अरुण ठेंगरे, श्रावण झाडे, बालू भाऊ इंगोले , राजू खडतकर, किरण रेवतकर, फैसरभाई, प्रशांत कलोडे इत्यादी कार्यकर्ते तसेच शासकीय कर्मचारी सदर पाहणी करतेवेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *