- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : शाळेतील सांस्कृतिक तासांनी घडवले – सुधीर गाडगीळ

निवेदन, मुलाखतींच्या अनुभवाबद्दल रंगल्या गप्पा

नागपूर समाचार : शाळेच्या सांस्कृतिक तासात जे वक्ते यायचे ते उत्कृष्टपणे विविध विषय हाताळयचे. ज्ञानोबा, तुकोबा यांच्या गोष्टी, अभंग सांगायचे यामुळे शाळेतून जे संस्कार झाले त्यातून वाचन, निवेदन आणि लोकांना बोलते करण्याची आवड निर्माण झाली, असे मनोगत ज्येष्ठ निवेदक, अनुभवी मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले. 

देशविदेशात 6235 मुलखती घेणारे सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या मुलाखती आणि निवेदनाच्या अनुभवाबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

जागो जानो जियो क्लब, स्वरस्नेही आणि बी.आर. ए. मुंडले इंग्लिश मिडीयम स्कुल तर्फे गुडीपाडव्यानिमित्त शब्द -स्वरोत्सव या मुलाखत आणि गण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पहिल्या कार्यक्रमात आज बी.आर. ए. मुंडले हॉल येथे ज्येष्ठ निवेदक, अनुभवी मुलाखतकार आणि प्रभावी संवादसाधक सुधीर गाडगीळ यांच्याशी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम झाला यावेळी मुकुंद देशपांडे यांनी गाडगीळ यांची मुलाखत घेतली. 

गाडगीळ पुढे म्हणाले की, 16 ते 23 या वयात गोळवलकर गुरुजी, शरद पवार, रामभाऊ म्हाळगी, जॉर्ज फर्नांडिस यांना भेटण्याचा योग आला. डायरी लिहायच्या सवयीने प्रत्येक मुलाखत झाली की त्याच्या नोंदी ठेवायची सवय लागली आणि ते अत्यंत उपयोगाचे ठरले. त्याशिवाय केसरी वर्तमानपात्रात पत्रकरिता आणि सकाळ, लोकसत्ता, तरुण भारत अश्या अनेक वृत्तपत्रासाठी लेख यामूळे ओळखी वाढल्याचे ते म्हणाले. हिंदी, इंग्रजी, मराठी या सर्व भाषेतील आत्मचरित्राचे वाचन हे मुलाखतीसाठी पार्श्वभूमि तयार करायला मदत करायचे असेही ते म्हणाले. 

या कार्यक्रमाची संकल्पना मुकुंद देशपांडे यांची होती. या कार्यक्रमाला सप्तक, नागपूर, स्पर्श नागपूर, आणि चित्तपावन ब्राह्मण संघ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. सुरवातीला मिलिंद देशपांडे लिखित मानपत्राचे वाचन मुकुंद देशपांडे यांनी केले. तत्पूर्वी पुणे ते गोवा हा प्रवास सायकल ने 40 तासात पूर्ण करणाऱ्या कविता सुमंत मुंडले यांचा सत्कार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमर कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या उतारार्धात उपस्थित रसिकांनी प्रश्न विचारले.

नरेंद्र मोदी यांची मुलाखत घ्यायला आवडेल : गाडगीळ म्हणाले के अनेक राजकारणी आणि सिनेस्टार यांच्या मुलाखती घेतल्या. कुणाची मुलाखत घ्यायची राहिली असेल तर ती नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची आहे असे ते म्हणाले. परंतु ते व्यस्त राजकारणी नेते आहेत असे देखील ते म्हणाले.

निवेदन आता नको : पूर्वी गाण्याच्या कार्यक्रमाचे निवेदन केले तर श्रोते तशी दाद द्यायचे. गायकाने गाणी म्हणताना चूक झाली तर ती बोलून दाखवायचे. असे श्रोते कमी होत असल्याने निवेदनाची मजा राहीली नसल्याची खंत गाडगीळ यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *