- Breaking News, नागपुर समाचार

रामटेक समाचार : मेक्सिकन पाहुण्‍यांनी साजरी केली रामटेकमध्‍ये होळी 

रामटेक समाचार : रोटरी फ्रेंडशिप एक्‍सचेंज प्रोग्राम अंतर्गत नागपुरात आलेल्‍या मेक्सिकन पाहुण्‍यांनी रामटेक येथील सीएसी ऑलराऊंडरच्‍या कॅम्‍प चेरी फार्मला भेट दिली व येथे होळी साजरी केली.

रोटरी इंटरनॅशनल डिस्‍ट्रीक्‍ट 3030 च्‍यावतीने आयोज‍ित करण्‍यात आलेल्‍या या रामटेक भेटीमध्‍ये मेक्सिकन मेक्सिकन रोटरीचे सदस्‍य फर्नांडो, होजे जोसे, इरिका, मारिया, लुपिटा, बेल्‍ला, जिराल्‍डीया यांच्‍यासोबत श्रीया मोकादम, निशा कामथ, सीए महेंद्र कामथ यांचा समावेश होता.

कॅम्‍प चेरी फार्मच्‍या संचालक रजनी खंते व त्‍यांच्‍या चमूने या मेक्सिकन चमूचे पळसांच्‍या फुलांचे मुकूट भेट देऊन स्‍वागत केले. सर्व पाहुण्‍यांच्‍या हातावर मेहंदी रेखाटण्‍यात आली. एकमेकांना गुलाल लावून या पाहुण्‍यांनी होळीचा सण साजरा करीत भारतीय संस्‍कृती व परंपरांची माह‍िती जाणून घेतली. त्‍यानंतर कॅम्‍प चेरी फार्म परिसरातील अॅडव्‍हेंचर अॅक्‍टीव्‍हीटींचा या पाहुण्‍यांनी आनंद घेतला. जवळच असलेल्‍या कपूर बावडीलाही भेट देत तेथील स्‍थापत्‍य कलेचे या मंडळींनी कौतूक केले. त्‍यांना कॅम्‍प चेरी फार्मच्‍या संचालक अमोल खंते, मनिष मंख, संदेश यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *