- Breaking News, नागपुर समाचार

वर्धा समाचार : प्रबोधनाची चळवळ ही महाराष्‍ट्राची देण – डॉ. श्रीकांत तिडके

‘महाराष्‍ट्राची प्रबोधन परंपरा’ विषयावर परिसंवाद 

वर्धा समाचार : भारतात प्रबोधनाची चळवळ ही फ्रेंच क्रांतीतून उद्यास आली असे बोलले जाते. परंतु, ते खरे नसून महाराष्‍ट्रांतील संतांनी ही चळवळ सुरू केली, असे प्रतिपादन ज्‍येष्‍ठ संत साहित्‍य‍िक श्रीकांत तिडके यांनी केले. 

96 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या पहिल्‍या द‍िवशी प्राचार्य राम शेवाळकर व्‍यासपीठावर उद्घाटन सत्रानंतर कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्‍ट्राची प्रबोधन परंपरा विषयावर परिसंवाद पार पडला. डॉ. श्रीकांत तिडके अध्‍यक्षस्‍थानी होते तर रेखा नार्वेकर, वासुदेव वले, डॉ. हनुमंत भोपाळे व डॉ. रमेश जलतारे यांनी यात सहभाग नोंदवला.

लोकांमध्‍ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्‍यात संतांचे मोठे योगदान राहिले असून अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केवळ महाराष्‍ट्राने स्‍वीकारला याचे पूर्ण श्रेय संत गाडगे महाराजांना जाते, असे सांगताना श्रीकांत तिडके म्‍हणाले.  

संत गाडगेबाबा, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्‍या विचारांचा झेंडा तेजस्‍वीरित्‍या फडकवत ठेवला आहे, असे मत रेखा नार्वेकर यांनी व्‍यक्‍त केले. इतर मान्‍यवरांनीदेखील आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्‍योती भगत यांनी केले तर डॉ. शोभा बेलखोडे यांनी आभार मानले. 

कथाकथनाला उत्‍तम प्रतिसाद

सहकार महर्षी बापूरावजी देशमुख व्‍यासपीठात आयोजित करण्‍यात आलेल्‍या कथाकथनाला रसिकांचा उत्‍तम प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी डॉ. सुनंदा गोरे होत्‍या तर एकनाथ आव्‍हाड, अर्जुन व्‍हटकर, विलास सिंदगीकर, अशोक मानकर, प्रिया जोशी, गजानन देसाई यांचा यात सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री अंबासकर यांनी केले तर प्रा. प्रमोद नारायणे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *