- Breaking News, नागपुर समाचार, शीत सत्र २०२३

नागपूर समाचार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्नेह मिलन कार्यक्रमाला पत्रकारांचा बहिष्कार

डिजिटल मध्यम समुहाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे..

नागपूर समाचार : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२७ डिसेंबर) रोजी नागपूरच्या देवगिरी निवासस्थानी येथे पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या स्नेह मिलनाचा कार्यक्रमाला अनेक पत्रकारांनी बहिष्कार टाकला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यासाठी जबाबदार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देवगिरी येथे पत्रकारांसाठी स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका वितरणाची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे होती. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक जयश्री भोज या आहेत. नागपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी पुढाकार घेऊन आपल्या मर्जीतील पत्रकारांना निमंत्रण पत्रिका दिल्या. 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती / प्रशासन) हेमराज बागुल यांच्या निर्देशानुसार ही निमंत्रण पत्रिका वितरित करण्यात आली, हे विशेष. राज्याचे कर्तुत्वान व लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकाभिमुख विकास कार्य करीत आहे. त्याची प्रसिद्धी राज्यातील सर्वच न्यूज पोर्टल, यू-ट्यूब चॅनल्ससह वृत्तपत्र, न्यूज चॅनल्स बातम्या प्रकाशित करून करीत असतात. यामध्ये न्यूज पोर्टल, यू-ट्यूब चॅनल आघाडीवर आहे. त्यांच्याच संचालक व संपादकांना निमंत्रण देण्यात आले नाही.

बंगाली बाबूने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल यांच्यावर काळी जादू केल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. या प्रकाराबद्दल डिजिटल मध्यम समुहाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

प्रविण टाके हे जेव्हापासून नागपूर जिल्हा माहिती अधिकारी पदी नियुक्ती झाले. तेव्हापासून असे प्रकार पत्रकारांसोबत घडत आहे. या पूर्वीचे माहिती अधिकारी हे न्यूज पोर्टलचे संचालक व संपादकांना शासकीय निमंत्रण पाठवीत असत. सध्या स्थितीत समाज माध्यमे हे प्रभावशाली आहेत. त्यांची वाचक संख्या ही लाखांत आहे. सर्वात जलद गतीने बातम्या प्रसारित करतात. हे येथे आवर्जून सांगावस वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *