- Breaking News, नागपुर समाचार, शीत सत्र २०२३

नागपुर समाचार : संत्री आहेत गोड, भूखंड खाण्यासाठी चढाओढ; विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

धानाला बोनस मिळालाच पाहिजे

नागपूर समाचार : दिल मांगे मोर, सत्ताधारी चोर.. नागपूरची संत्री भ्रष्टाचारी मंत्री, राजीनामा द्या राजीनामा द्या अब्दुल सत्तार राजीनामा द्या अशा घोषणांनी विरोधकांनी विभान भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. हातात संत्री घेऊन जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी आजही आंदोलनाचा तीव्र सूर विधान भवन परिसरात आवळला.

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात विरोधकांच्या आंदोलनाने सुरू झाली. शेतकरी उपाशी, मंत्री आहे तुपाशी, खोके येऊ द्या येऊ द्या, उद्योग जाऊ द्या-जाऊ द्या.. सह संत्री आहेत गोल, सत्ताधाऱ्यांचा वाजवा ढोल, संत्री आहेत गोड, भूखंड खाण्यासाठी चढाओढ, धानाला बोनस मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी विरोधकांनी विधान भवन परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनात विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, रोहित पवार, सुनील केदार, विकास ठाकरे, किरण लहामटे, भास्कर जाधव आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *