- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : संशोधन प्रकियेला गती व दर्जा मिळेल – डॉ. संजय कविश्‍वर

पीएच.डी. पूर्व अभ्‍यासक्रमाला विद्यार्थ्‍यांचा उत्‍तम प्रतिसाद

नागपूर समाचार : पीएच.डी. पूर्व अभ्‍यासक्रम हा संशोधन प्रक्रियेतील अतिशय महत्‍वाचा टप्‍पा असून हा पाया मजबूत झाला तरच संशोधन कार्याला गती आणि दर्जा मिळतो, असे प्रतिपादन नागपूर विद्यापीठाच्‍या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्‍ठाता डॉ. संजय कविश्वर यांनी केले. 

नागपूर विद्यापीठाच्‍या नव्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार सी.पी. अँड बेरार महाविद्यालयाच्‍यावतीने तयार केलेल्‍या पीएच.डी. पूर्व अभ्‍यासक्रमाची नुकतीच कार्यशाळा घेण्‍यात आली. महाविद्यालयाच्‍या द प्लेस फॉर हायर लर्निंग अँड रिसर्चने वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत पीएच.डी. करीत असलेल्‍या विद्यार्थ्यांसाठी ४ क्रेडिट्सचा हा अभ्‍यासक्रम तयार केला आहे. या अभ्‍यासक्रमाच्‍या कार्यशाळेला विविध ठिकाणांहून ४५ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. संजय कविश्वर यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद बारहाते यांनी राष्ट्र उभारणीसाठी गुणवत्ता संशोधनाची गरज असल्याचे नमूद केले.

प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. संजय दुधे उपस्थित होते. त्यांनी पीएच.डी. पदवीमध्ये कोर्स वर्कचे महत्त्व पटवून दिले. अशाप्रकारचा अभ्‍यासक्रम तयार केल्‍याबद्दल त्‍यांनी आयोजकांचे अभिनंदनही केले. यावेळी डॉ. निलेश उगेमुगे, डॉ. आशिष लिंगे, डॉ.रेखा शर्मा, डॉ. सुमित अरोरा, डॉ.प्रवीण बागडे, डॉ. निंबार्ते, डॉ. सुजित मैत्रे, डॉ. तुषार चौधरी, डॉ. मेधा कानेटकर यांचे विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *