- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

विदर्भ समाचार : भंडारा, गोंदियातही व्‍हावे ग्रामायण प्रदर्शन – आ. परिणय फुके

भूमिपूजन सोहळा सम्पन्न

विदर्भसमाचार : ग्रामायण प्रतिष्‍ठानतर्फे दरवर्षी आयोजित होत असलेले ग्रामायण प्रदर्शन हे केवळ नागपूरच नाही तर ग्रामीण भागातील लघूउद्योजक, गृहउद्योग, बचतगट, छोटे कारागीर यांच्‍यासाठी लाभदायक ठरत आहे. भंडारा, गोंदियातही हे ग्रामायण प्रदर्शन भ‍रविले जावे, असे आवाहन आ. परिणय फुके यांनी केले.

रामनगर येथील मैदानावर येत्‍या २२ ते २६ डिसेंबर दरम्‍यान ग्रामायण सेवा प्रदर्शन आयोजित करण्‍यात येणार असून त्‍याचा भूमिपूजन समारोह आ. परिणय फुके यांच्‍या हस्‍ते मंगळवारी पार पडला. कार्यक्रमाला माजी नगरसेविका सौ. परिणिता फुके, सुशांत पॅकेजिंगचे मालक प्रसिद्ध उद्योजक श्रीकांत उर्फ छोटू भैय्या नागमोते यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. फुके यांनी प्रदर्शनाला सर्वातोपरी मदत करण्‍याचे यावेळी आश्‍वासन दिले. परिणीता फुके यांनी प्रदर्शनाला शुभेच्‍छा देताना रामनगरातील नागरिक सर्वार्थाने हे प्रदर्शन यशस्‍वी करतील, असे आश्‍वासन दिले. श्रीकांत नागमोते यांनीदेखील शुभेच्‍छा दिल्‍या. 

ग्रामायण प्रतिष्‍ठानचे सचिव संजय सराफ यांनी ग्रामायणमध्‍ये यंदा ग्रामीण भागातील तसेच स्वनिर्मित उद्योगांचे एकुण 125 स्‍टॉल्‍स राहणार असल्‍याचे सांगितले. पोषण, आरोग्य आणि पर्यावरण या तीन विषयांवर तीन दिवस भरगच्च कार्यक्रम राहणार असून जुगाडू इंजिनियर्स स्पर्धा, सक्रिय महिला मंडळ स्पर्धा, ज्येष्ठ नागरिक समाज योद्धा स्पर्धा अशा विविध स्‍पर्धाचे आयोजन करण्‍यात येणार असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली. प्रदर्शनीचे मुख्‍य संयोजक राजेंद्र काळे यांनी सर्वांचे आभार मानले. 

यावेळी ग्रामायण प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष अनिल सांबरे व इतर पदाधिकारी प्रशांत बुजोणे, मिलिंद गिरीपुंजे, रमेश लालवाणी, अनुराधा सांबरे, सुरेखा सराफ, अॅड. जयश्री अलकरी, पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्‍यक्ष रवी वाघमारे, राजीव काळेले, विनोद जोशी, अजय डबीर, अशोक आग्रे, मुकुंद सरमुकदम, वृशाली शिलेदार, मुकुंद महाजन, अशोक केदार, सन्मित्र सभेचे सचिव राजन भूत, सुनील खानखोजे, उमाळकर वहिनी, रामनगर नागरिक आणि ग्रामायणचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्‍थ‍ित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *