- Breaking News, विदर्भ

अमरावती समाचार : जनसेवेच्या विश्वासाला अमरावतीकरांचे बळ, पुन्हा एकदा फुलणार भाजपाचे कमळ

अमरावती समाचार : अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आज अमरावती येथे आयोजित भव्य ‘रोड शो’मध्ये उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला.

या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार आहे, गेल्यावेळी अमरावती महानगरपालिका भाजपाकडे होती, त्या काळात अनेक योजना भाजपाने राबवल्या. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिलेल्या अमृत योजनेमधून कोट्यवधी रुपयांचा निधी अमरावतीच्या विकासासाठी देण्यात आला.

रस्ते विकासासाठी जवळपास 212 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला. तसेच अमरावतीमध्ये लवकरच विमान प्रशिक्षण संस्था सुरु होत असून त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. बडनेरा सांस्कृतिक भवन, बससेवा, वेगवेगळ्या प्रकारचे सुशोभीकरण अशा अनेक गोष्टी भाजपाच्या कारकिर्दीत पूर्ण करण्यात आल्या. राज्य सरकारने 200 कोटी रुपयांच्या अंबादेवी प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

आम्ही केवळ आश्वासनांवर नव्हे, तर केलेल्या कामांवर आणि पुढील स्पष्ट व्हिजनवर मते मागत आहोत. अमरावतीला आधुनिक, रोजगारक्षम आणि विकसित शहर बनवण्याचा आमचा संकल्प आहे. येत्या 15 तारखेला भाजपाची जबाबदारी तुम्ही घ्या, पुढची 5 वर्षे तुमच्या शहराच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार डॉ. संजय कुटे व इतर मान्यवर उपस्थित होते.