- Breaking News

विदर्भ समाचार : अहेरी तालूका कॉंग्रेस तर्फे उपवनसंरक्षक आल्लापल्ली यांना निवेदन

अहेरी तालूका कॉंग्रेस तर्फे उपवनसंरक्षक आल्लापल्ली यांना निवेदन      

विदर्भ समाचार : अहेरी- पंतप्रधान ग्रामसडक योजना अंतर्गत सन 2019 पासून चालू झालेला अहेरी ते खमनचेरू रस्त्याचे काम अजून ही थंड बस्त्यात सन 2022 संपन्याच्या स्थिती आले तरी अहेरी विभाग मधील जनता उपेक्षित आहे. खडतर रस्त्यामूळे जिव मूठीत बांधून प्रवास करताना कधी काय होईल याचे सांगता येणार नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे रस्ता डिसेंबर 2022 ला सूरूवात झाली होती परंतू संबंधीत ठेकेदार नी काम थांबविलेले आहे.

त्यांचे कारण फॉरेस्ट नी परवानगी दिले नाही असे ठेकेदार चे म्हणने आहे . त्या नूसार अहेरी तालूका कॉंग्रेस तर्फे मा. उपवनसंरक्षक साहेब यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करण्यात आले तेंव्हा उपवनसंरक्षक सा. यांनी अजून पर्यंत त्यांनी आमच्या कार्यालये कडे परवानगी करीता पत्र व्यवहार केले नाही जर संबंधीत विभागांनी रितसर पत्र व्यवहार जर केले तर दोन दिवसांत परवानगी देण्याचे व्यवस्था करण्यात येईल असे चर्चा दरम्यान उपवनसंरक्षक यांनी सांगितले आहे.

तरी संबंधीत विभागानी लवकरात लवकर वन विभागाला पत्र व्यवहार करून परवानगी घेऊन काम चालू करावी हे काम जवळपास तीन वर्षांपासून चालू आहे संपूर्ण रस्ता खोदून ठेवले त्यामूळे उपेक्षित जनता चार वर्षांपासून सहन करीत आहे अजून किती दिवस सहन करावी हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. जर लवकरात लवकर काम जर सूरू झाले नाही तर कॉंग्रेस तर्फे कठोर भूमिका घेण्यात येईल.

निवेदन सादर करते वेळी तालुका अध्यक्ष डॉ. निसार हकीम, नामदेव आत्राम, किसान सेल अशोक आईंचवाार, बबलू सडमेक, रज्जाक पठाण, रूपेश बंदेला, सतीश मडावी. रोहीत च ला वार. सूरेश दूर्गे उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *