- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपुर समाचार : मानवी जीवनाचे देवत्व कसे प्रकट करावे ते ज्ञानेश्वरी सांगते – प. पू. संजय गोडबोले गुरुजी

श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त ‘पसायदान एक वैश्विक प्रार्थना’ विषयावर प्रवचनमालेचे तिसरे  पुष्प. ह. भ. प. मनोहर बुआ दीक्षित यांच्या कीर्तन सप्ताहात भाविक मंत्रमुग्ध 

नागपुर समाचार : जीवन कसे जगावे, आपल्या दोषांना आत्मपरीक्षणाने कसे बदलावे आणि मानवी जीवनाचे देवत्व कसे प्रकट करावे ते ज्ञानेश्वरी सांगतेअसे प्रतिपादन प. पू. संजय गोडबोले गुरुजी, संस्थापक संत सेवा संघ, पुणे यांनी केले. प. पू. समर्थ सद्गुरू श्री. विष्‍णुदासस्‍वामी महाराज अध्‍यात्‍म-साधना केंद्र, नागपूरच्‍यावतीने 29 नोव्‍हेंबर तर 8 डिसेंबर दरम्‍यान श्री दत्‍त जयंती उत्‍सव सोहळ्याचे आयोजन करण्‍यात आले आहे.या अंतर्गत संत सेवा संघ पुणेचे संस्थापक  प्रवचनकार प. पू. संजय गोडबोले गुरुजी यांचे ‘पसायदान एक वैश्विक प्रार्थना’ विषयावर प्रवचनमाला आयोजिण्यात आली असून याच मालेचे तिसरे  पुश गुंफताना गोडबोले गुरुजी बोलत होते.

याप्रसंगी प. पू. श्री. सद्गुरुदास महाराज यांची सार्थ उपस्थिती होती. संस्थापक  प्रवचनकार प. पू. संजय गोडबोले गुरुजी पुढे म्हणाले की आपल्या मध्ये जो ब्रम्ह आहे त्याची अनुभूती येण्यासाठी आपल्याला येणारे विचार, भिती, मोह  इत्यादी बद्दल पडणाऱ्या प्रश्ननांची उत्तरे आपल्याला सापडायला हवी. त्यामुळे केवळ ग्रंथ वाचन नको तर त्या ग्रंथातून शक्य तितके आत्मसात करण्याची गरज गोडबोले गुरुजी यांनी बोलून दाखविली. ज्ञानेश्वरी हा जीवन ग्रंथ आहे. आपले वागणे हे ग्रंथाच्या अनुरूप असले पाहिजे. हा ग्रंथ वाग्यज्ञ जो जगच्या कल्याणासाठी आहे आणि म्हणून केवळ पोथी म्हणून न वाचता ते आचरणात यावे अशी पॆक्षा त्यांनी व्यक्त केली. 

‘देव विनायक रे घ्यावा आरंभी’ हे गोसावीनंदन यांचे पद कीर्तनात सादर करून  ह. भ. प. मनोहर बुआ दीक्षित यांच्या कीर्तन सप्ताहात भाविक मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले. भक्तांनी भेदाभेद वृत्ती सोडून अध्यत्मा करावा असे सार त्यांनी कीर्तनातून मांडले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात श्रीगुरुपूजेनंतर परमपूजनीय श्री. सद्गुरूदास महाराज यांच्या गुरूवाणीतून उपस्थित भाविक श्रोत्यांनी श्रीगुरुचरित्राचे श्रवण/पारायण केले.

आजचा कार्यक्रम – दुपारी 3.30 ते 5 वाजेदरम्‍यान संत सेवा संघ पुणेचे संस्थापक  प्रवचनकार प. पू. संजय गोडबोले गुरुजी यांचे ‘पसायदान एक वैश्विक प्रार्थना’ विषयावर प्रवचनाचे तिसरे पुष्प. याशिवाय श्री गुरुमंदिर, 80, आरबीआय कॉलनी, जयप्रकाश नगर खामला येथे या अंतर्गत या सोहळ्यात विविध धार्मिक आणि सांस्‍कृतिक कार्यक्रम होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *