- नागपुर समाचार

नागरिकांनी मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा.

नागपूर:- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाद्वारे दिव्यांगांसाठी एडीआयपी योजना आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत मोफत सहायक साधने वाटप शिबिराला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता शिबिराला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नवीन तारखेनुसार २६ एप्रिलपर्यंत तपासणी शिबिर सुरू राहणार आहे. शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक तपासणी करून योजनेचा लाभ घेत आहेत. आपणही लाभापासून वंचित न राहता वेळेत नोंदणी करून घ्यावे.


दिव्यांगांसाठी आवश्यक कागदपत्रे / पात्रता
– जिल्हा प्रशासनातील सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले ४० टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
– मासिक उत्पन्न असल्याचा दाखला आवश्यक.
– आधार कार्ड
– दोन पासपोर्ट फोटो

एडीआयपी योजनेंतर्गत देण्यात येणारी उपकरणे
– चालण्यासाठी काठी
– कॅलीपस
– कुबडी
– कृत्रिम अवयव
– तीन चाकी खुर्ची
– श्रवण यंत्र
– तीन चाकी सायकल
– शैक्षणिक संच
– संडास खुर्ची
– ब्रेल कीट (दृष्टीहीन करिता)
– व्हील चेयर
– स्मार्ट फोन (दृष्टीहीन करिता)
– ट्रायसिकल (बॅटरी)
– स्मार्ट केन (दृष्टीहीन करिता)

वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे / पात्रता
– वय ६० वर्षापेक्षा जास्त
– वार्षिक उत्पन्न १ लाख ८० पेक्षा कमी
– आधार कार्ड
– उत्पन्नाचे प्रमाणपत्र /बी.पी.एल. कार्ड
– पासपोर्ट फोटा (४)

राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत देण्यात येणारी उपकरणे
– चालण्यासाठी काठी
– संडास खुर्ची
– कुबडी
– कमरेचा पटटा
– श्रवणयंत्र
– मानेचा पटटा
– तीनचाकी खुर्ची
– चष्मा , दाताची कवळी 

Leave a Reply

Your email address will not be published.