- Breaking News, नागपुर समाचार

हिंगणघाट समाचार : ना. नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातुन काढण्याची भाजपाने केली मागणी

महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी आशावरी देशमुख यांचे नेतृत्वात केला जोरदार निषेध

हिंगणघाट समाचार, दि. २४ फेब्रूवारी : आतंकी संघटनांना टेरर फंडिंग करणारे राज्य मंत्रिमंडळातील सदस्य नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातुन तात्काळ काढण्यात यावे या मागणीसाठी शहरात भाजपाचेवतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नावे स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी आसावरी देशमुख यांचे नेतृत्वात जोरदार निषेध करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा महिलाध्यक्षा मंजुषा दुधबडे, माया उमाटे, जिल्हा परिषदेच्या सभापती मृणाल माटे, जिल्हा महामंत्री तथा महिला मोर्चा पालक मार्गदर्शक किशोर दिघे, शहर अध्यक्ष आशिष पर्बत, सुभाष कुंटेवार, सौ. छाया सातपुते, रविला आखाडे, शुभांगी डोंगरे, अल्पसंख्यांक आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कौसर अंजुम, अनीता मावळे, सुनीता मावळे, अर्चना जोशी इत्यादि मान्यवर हजर होते.

ना.नवाब मलिक यांचे मुंबई बॉम्ब हल्ल्यातील आरोपी दाऊद इब्राहिम यांचेसोबत व्यवसायिक संबंध असून त्यांनी आतंकवाद्यांना आर्थिक मदत केल्याचे पुरावे प्रवर्तन निदेशालयाला प्राप्त झाले असून त्यांना अटकसुद्धा करण्यात आली आहे. त्यांना मंत्रीमंडळातुन तात्काळ हटविण्यात यावे या मागणीसाठी आज दि. २४ रोजी निवेदन देण्यात आले.

नवाब मलिक यांना मंत्रीमंडळातुन तात्काळ बरखास्त न केल्यास भाजपाच्यावतीने आंदोलनाचा इशारासुद्धा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देतांना भाजपाचे माजी नगरसेवक शारदा पटेल, वैशाली सुरकार, रश्मी पर्वत, अनिल गहरवार, दत्ता जाम्भूळे, बबलू खेनवार, गजानन वाट,प्रविण वरटकर, प्रभाकर सुपारे, रामदास सूपारे, मारोती साठे, ज्ञानेश्वर भागवते, दिनेश वर्मा, वैशाली पालांडे, संगीता मेंढे, सारिका उभाटे, अनील मावळे, सरीता कुरेकार, किशोर रोंघे, विजय धुमाळ, संदीप सुरकार इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.