- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : फुटाळा येथील म्युझिकल फाउंटेनला स्व.लता मंगेशकर यांचे नाव द्यावे : डॉ. आशिष र. देशमुख

फुटाळा येथील म्युझिकल फाउंटेनला स्व.लता मंगेशकर यांचे नाव द्यावे

नागपूर समाचार, ८ फेब्रुवारी : नागपूरच्या फुटाळा तलावात ९४ म्युझिकल फाउंटेन लावण्यात येणार असून देशातील ते एकमेव आकर्षणाचे केंद्र बनणार आहे. पर्यटकांना विहंगम दृश्याचा आनंद घेता येईल. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती भागात वसले आहे. नागपूर हे महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून उदयास यावे, यादृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. या जागतिक स्तरावरील म्युझिकल फाउंटेनमुळे नागपूरचे नाव मोठे होणार आहे. महामेट्रो, नागपूर महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) व नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) यांच्याकडे हा प्रकल्प पूर्णत्वासाठी सोपविण्यात आला आहे आणि तो पूर्णत्वास आला आहे.

“या म्युझिकल फाउंटेनचा रसास्वाद घेण्यासाठी इच्छुक हजारो प्रेक्षकांसाठी भव्यदिव्य गॅलरी, भव्य लेझर शो, आकर्षक लायटिंग, म्युझिक, मल्टीमिडिया शो, ५० फुट उंच उडणारे गगनचुंबी कारंजे नागपूरचा चेहरामोहरा बदलणार आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाला नागपूरकडे आकर्षित करण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. नागपूर या देशाच्या मध्यवर्ती शहरात सर्व ठिकाणांवरून पर्यटकांची रीघ लागणार असून नागपूर जागतिक स्तरावरचं एक चांगलं शहर म्हणून नावारूपास येणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसुद्धा होणार आहे.

“या म्युझिकल फाउंटेनला भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांचे नाव दिल्यास वर्ल्ड क्लास फाउंटेन म्हणून याची ओळख निर्माण करता येईल. आणि ‘स्व.लता मंगेशकर म्युझिकल फाउंटेन’मध्ये लता दीदींची गाणी वाजविल्यास ती त्यांना खरी श्रद्धांजली असेल. या म्युझिकल फाउंटेनच्या कारंज्यांद्वारे लता मंगेशकर यांची गाणी नव्या पिढीपुढे व पर्यटकांपुढे उजागर करता येतील. मागील ७-८ दशकात त्यांनी गायलेल्या गाण्यांचा त्यात समावेश असावा. फुटाळा येथील म्युझिकल फाउंटेनला स्व.लता मंगेशकर यांचे नाव द्यावे आणि ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्मारक निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत”, अशी मागणी माजी आमदार व लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूरचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *