- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपुर समाचार : युवातर्फे मनपाला पीपीई आणि पर्सनल हायजेनिक किट भेट

फ्रंट लाईन वर्कर्सच्या सुरक्षेसाठी पुढाकार

नागपुर समाचार : कोरोनाच्या संकटात फ्रंट लाईन वर्कर्स तसेच अन्य कर्मचा-यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षेसाठी युथ फॉर युनिटी अँड व्हॉलेंटरी ॲक्शन (युवा)तर्फे नागपूर महानगरपालिकेला १६०० पीपीई किट आणि १०० पर्सनल हायजेनिक किट भेट देण्यात आले.

मंगळवारी (ता.१६) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांच्याकडे युवाच्या पदाधिका-यांनी पीपीई आणि पर्सनल हायजेनिक किट सुपूर्द केल्या. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, आरोग्य विभागाचे राहुल निनावे, युवाचे सीनिअर प्रोजेक्ट असोसिएट नितीन मेश्राम, सीनिअर कन्स्लटंट नीलेश खडसे, शहर विकास मंचचे अनिल वासनिक, शैलेंद्र वासनिक आदी उपस्थित होते.

याप्रसंगी प्रतिकात्मक स्वरूपात मनपाच्या काही आशा सेविकांना पीपीई किट आणि पर्सनल हायजेनिक किट देण्यात आले. कोरोनाच्या संकटाचा सुरक्षितरित्या सामना करता यावा यासाठी यापूर्वीही युवातर्फे मनपाला सुरक्षा साहित्य प्रदान करण्यात आले होते. पीपीई किट आणि पर्सनल हायजेनिक किटसह मनपाच्या कोव्हिड केअर सेंटर, हेल्थ पोस्ट येथे हँडवॉशिंग सेंटर सुद्धा युवातर्फे देण्यात आले असून ते लवकरच मनपाकडे सुपूर्द करण्यात येतील, असे यावेळी युवाचे नितीन मेश्राम यांनी सांगितले.

आशा सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच प्रत्यक्ष नागरिकांमध्ये जाउन जनजागृती करून सेवा देणा-या मनपाच्या कर्मचा-यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने युवातर्फे पीपीई किटसह १०० पर्सनल हायजेनिक किट देण्यात आलेल्या आहेत. या किटमध्ये मास्क, सॅनिटरी पॅड, टूथ पेस्ट आणि ब्रश, साबण, शॅम्पू, तेल, कंगवा, नेलकटर, हातरुमाल आदी साहित्याचा समावेश आहे.

आरोग्य आणि सुरक्षेच्या कार्यामध्ये मनपाला युवा तर्फे करण्यात आलेल्या सहकार्याबद्दल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी मनपातर्फे युवा तसेच शहर विकास मंचच्या पदाधिका-यांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *