- नागपुर समाचार, मनपा

प्रभाग ३४मधील नळ लाईनचे काम तात्काळ सुरू करा स्थापत्य समिती राजेंद्र सोनकुसरे यांचे निर्देश

नागपूर, ता. १३ : हनुमाननगर झोन मधील प्रभाग क्रमांक ३४ (ब) अंतर्गत शेषनगर, जबलपूरे लेआऊट या परिसरामधील नळ लाईनचे काम तात्काळ सुरू करा, असे निर्देश मनपाचे स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती तथा स्थानिक नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे यांनी दिले.

            प्रभाग क्रमांक ३४ (ब) अंतर्गत शेषनगर, जबलपूरे लेआऊट येथील नागरिकांना वारंवार भेडसावणा-या पाणी समस्येसंदर्भात राजेंद्र सोनकुसरे यांनी परिसराची पाहणी केली. यावेळी जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई यांच्यासह हनुमान नगर झोनचे जलप्रदाय अधिकारी डेलिगेट,  अभियंता, ओसीडब्ल्यूचे अधिकारी, कंत्राटदार आदी उपस्थित होते.

            शेषनगर, जबलपूरे लेआऊट भागामध्ये नळ लाईन टाकण्यासाठी विशेष प्रयत्न करून स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी नळ लाईन टाकण्याचे प्रस्ताव मंजुर करून घेतले. याच भागातील दोन लाईनचे काम प्रलंबित असल्याने त्यांनी भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी उपस्थित अधिका-यांना तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

          यावेळी नागरिकांनी आनंद व्यक्त करीत मागील दहा पंधरा वर्षापासून अवधूत नगर शेष नगर जबलपुरे ले आऊट येथील समस्या सोडविल्याबद्दल राजेंद्र सोनकुसरे यांचे अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *