- मनपा

क्रांतीसिंह नाना पाटील जयंती निमित्त म.न.पा.तर्फे विनम्र अभिवादन

 नागपूर,ता. ३ : भारतीय स्वातंत्र्य लढयात प्रतिसरकार हा समांतर शासनाचा प्रयोग करुन ग्रामीण जनतेत स्वातंत्र्य मुल्य रुजविणारे क्रांतीकारक आणि बहुजन समाजाला विकासाकडे नेण्याचा सक्रियतेने प्रयत्न करणारे राजकीय नेते क्रांतीसिह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे केंद्रीय कार्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आज मंगळवार (३ ऑगस्ट) रोजी अति.आयुक्त दिपककुमार मीणा, अति.आयुक्त राम जोशी व स्थापत्य समिती सभापती राजेन्द्र सोनकुसरे यांनी  क्रांतीसिंहाचे छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

          यावेळी उपायुक्त सर्वश्री. रविन्द्र भेलावे, विजय देशमुख, मिलींद मेश्राम, समाजविकास अधिकारी दिनकर उमरेडकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेन्द्र उचके, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, सहा.जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, सहा. अधीक्षक राजकुमार मेश्राम, राजेश वासनिक आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *