- नागपुर समाचार

पूर्व नागपुरात कार्यकर्ते 1 लाख घरापर्यंत पोहोचणार : आ.कृष्णा खोपडे समग्र बूथ अभियान अंतर्गत धनसन्स लान येथे बूथ कार्यकर्त्याची बैठक संपन्न

NBP NEWS 24,

25 JULY 2021.

नागपूर : पूर्व नागपुरात कोट्यावधीची विकासकामे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेन्द्र्जी फडणवीस यांच्या सहयोगाने सुरु असून अनेक मोठे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. नागपूर शहरात देखील गडकरी-फडणवीस यांच्या जोडीने जवळजवळ 1 लाख कोटी रुपयाची विकासकामे सुरु आहे. मात्र जेव्हापासून राज्यात आघाडीचे सरकार आले, तेव्हापासून या सरकारने फक्त आणि फक्त विकासकामे थांबविण्याची कामे केली.

विकासकामात अडथळा कसा निर्माण करता येईल, हाच विचार घेऊन या तिन्ही पक्षाच्या सरकारने वाटचाल सुरु केली आहे. या दोन वर्षाच्या कालकीर्दीत एकही नवीन प्रोजेक्ट या शहरात या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते दाखवू शकणार नाही, अशी स्थिती आहे. येत्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भा.ज.प. ने केलेल्या भक्कम विकास कामाच्या बळावर भा.ज.पा. चे बूथप्रमुख,पेजप्रमुख व प्रमुख कार्यकर्ते पूर्व नागपुरात 1 लाख घरापर्यंत पोहोचणार असल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले. ते पूर्व नागपुरातील धनसन्स लान येथे आयोजित समर्थ बूथ अभियान अंतर्गत बूथप्रमुख व प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीत बोलत होते.
विदर्भ संगठन प्रमुख उपेंद्र कोठेकर व आशिष वांदिले यांनी संगठनात्मक बाबीवर आढावा घेऊन बूथप्रमुखांसोबत संवाद साधला.
यावेळी शहर अध्यक्ष आ.प्रविण दटके, सुनिल मित्रा, सचिन कहाळकर, रामभाऊ आंबुलकर, बाल्या बोरकर, संजय अवचट, प्रमोद पेंडके, मनिषा धावडे, धर्मपाल मेश्राम, चंदन गोस्वामी, महेंद्र राऊत, सेतराम सेलोकर, राजू गोतमारे, जे.पी.शर्मा, सुनिल सूर्यवंशी व सर्व नगरसेवक, बूथप्रमुख व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *