- Breaking News

वाईट प्रवृत्तीच्या सामना करण्यासाठी नारी शक्तींनी कांचन जोशी सारखे शौर्यवान व्हावे-डॉ ओळंबे.

NBP NEWS 24,

26 JULY 2021

अकोला-स्थानिक अकोला येथील रहिवासी जोशी दांपत्य हे ओंकारेश्वर येथे दर्शनाला गेले असता परतीच्या प्रवासामध्ये नितीन जोशी सौ. कांचन जोशी व श्‍याम बिहारी शर्मा यांच्यावर ओमकारेश्वर मोरटक्का या मार्गावर गाडीचे टायर पंचर झाले असे सांगून गाडी थांबवून या दांपत्यावर पिस्तूल रोखून सोनसाखळी पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना अकोल्यातील महिलेने व तिचा पती नितीन जोशी यांनी चांगला धडा शिकवला सौ.चंचल जोशी या महिलेने गुंडाजवळील पिस्तूल शिताफीने हिस्काऊन त्यांच्यावरच रोखली त्यामुळे ते सोनसाखळी घेऊन पळून जात असतांना त्यांचा पाठलाग करून चारही आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन केले.. या घटनेमुळे त्यांचेवर अकोला शहरासोबतच अनेक ठिकाणाहून कौतुकाचा वर्षाव होत आहे.नारी शक्तीचे कौतुक व सन्मान व्हावा यासाठी भाजपा नेते डॉअशोक ओळंबे प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा महाराष्ट्र,हिंदू बारी संघटनेचे गोपाल नागपुरे,भाजपा जिल्हा सदस्य संजय चौधरी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन या दांपत्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचे मनोधैर्य वाढविले याप्रसंगी श्रीकांत एखंडे,रवि देशमाने,राजू चव्हाण,विजय काकड,गोपाल बलोदे,सौरभ गुजर, अविनाश खुनोरे,विजय मोटे,सुनील होणारे हे प्रामुख्याने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *