- नागपुर समाचार

आज आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री

* 🟩🟧🟧सेवा दिवस संपन्न🟩🟧🟧 *
आज आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री

*मा. देवेन्द्रजी फडणवीस *    यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रभाग ३५ अ येथे विविध सेवाकार्य संपन्न झाले . सकाळी शताब्दीचौक ते नरेंद्रनगर चौक येथील बाजारातील दुकानदारांना आणि जनतेला मोफत मास्क देऊन कोरोना नियंत्रण मोहीम राबविण्यात आली. तसेच भाजपा जोगीनगर जनसंपर्क कार्यालयात शिबीर आयोजित करून मोफत डोळे तपासणी आणि मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबीराचे उदघाटन मनपा सत्तापक्ष नेते अविनाशजी ठाकरे व दक्षिण पश्चिम चे अध्यक्ष किशोरजी वानखेडे व दक्षिण पश्चिम चे महामंत्री महेंद्र भूगावकर यांच्या हस्ते करण्यात आले . तसेच यांच्या हस्ते गरजू गरीब ६०० लोकांना आयुष्यमान भारत चे कार्ड वाटप करण्यात आले. या कार्ड द्वारे ५ लाखापर्यंत गरीब परिवाराचा इलाज मोफत करण्यात येणार आहे . त्यामुळे अनेक गरीब लोकांना या दिवशी मोठा दिलासा देण्यात आला . तसेच देवेन्द्रजी ५१ वर्षाचे झाल्याने या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . तसेच ५१ झाडे भाजपा बूथ प्रमुखांना वाटप करून सम्पूर्ण बूथ मध्ये वृक्षारोपण करण्यात आले .
याप्रसंगी मोठ्याप्रमाणात भाजपा प्रभाग ३५ अ चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . शेकडो नागरिकांनी या सेवा दिनाचा लाभ घेतला . कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार …!
आपलाच
*संदीप गवई, नगरसेवक प्रभाग ३५ अ *

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *