- नागपुर समाचार

रक्तदान शिबिराद्वारे जपली सामाजिक जबाबदारी

*रक्तदान शिबिराद्वारे जपली सामाजिक जबाबदारी*

नागपूर :  साई आस्था फाऊंडेशन, गायत्री परिवार व नागपूर पोलीस आयुक्तालय यांनी गुरुवारी रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक जबाबदारी जपली. त्यांचे रक्तदानातील हे अमूल्य योगदान समाजाकरिता बहू-उपयोगी ठरणार आहे.

मानेवाडा-बेसा रोडवरील मिरा मेडिकलच्या परिसरात हे रक्तदान शिबिर झाले. या शिबिरात अनेक नागरिकांनी उत्साहात रक्तदान केले.अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला.नागपूर पोलिस द्वारे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) सुनील फुलारी, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णात पाटील व गायत्री परिवार नागपूरचे सह-समन्वयक दीपक बिडवे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर या प्रमुख अतिथींनी आपले विचार व्यक्त करताना आयोजक साई आस्था फॉउंडेशन व इतर सहकार्याचे या अमूल्य सामाजिक याेगदानासाठी अभिनंदन केले व प्रोत्साहित केले.तसेच, या शिबिराच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या रक्तामुळे अनेकांना जीवनदान मिळेल असा विश्वास व्यक्त केला आणि भविष्यातही असेच समाजोपयोगी कार्य करीत राहण्याचे आवाहन केले.
साई आस्था फॉउंडेशन द्वारे गेल्या 8 वर्षापासून नागपूर पोलीस आयुक्तालय व मेळघाट तथा गोंदिया-गढचिरोली नक्षल परिसरात महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने अनेक सेवाकीय शिबीर घेतले जातात तथा मागील दीड वर्षापासून कोविडच्या काळात औषधं पुरविणे, ऍम्ब्युलन्स सेवा,ऑक्सिजन सिलेंडर व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अनेक पेशंटला पुरविण्यात आले.त्यांच्या या सेवाकार्यास पोलीस डिपार्टमेंट कडून सुनील फुलारी सर व संदीप पाटील सरांनी कौतुकास्पद बोलण्यात आले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी साई आस्था फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आशिष नागपुरे, सेवेकरी आरुषी खानविलकर, अक्षता खानविलकर, मोनाली भोयटे, हितेश काटोले, मुकुंद काळमेघ, गायत्री परिवारचे बंडूजी मेश्राम व नागपूर पोलीस विभागाने अथग प्रयत्न केले.

————–

यांनी केले रक्तदान 

ओ-पॉझिटिव्ह

अभिजित आडेवार, मुकुंद काळमेघ, तुषार हेडाऊ, बंडू मेश्राम, वेदांत गोतमारे, सिद्धेश दांडेकर, हनुमंत दांडेकर, रोशन डोंगरे, मनोरंजन मिश्रा, संजय इमाने, आशिष बाजुलकर, उमेश निनावे, संजय पिसे.

०००

ए-पॉझिटिव्ह

रजत पथराल, राजेश खंडागते, सुनील कोरे, निसर्ग बेलखोडे, अक्षता खानविलकर,

०००

बी-निगेटिव्ह

मानस गहाणे,

०००

बी-पॉझिटिव्ह

प्रथम ठाकरे, सागर बरैय्या,

०००

एबी-पॉझिटिव्ह

निशांत घरपुसे, सत्येंद्र कटरे, विनयचंद्र शिम्पी,

०००

बी-पॉझिटिव्ह

अजय मेहरोत्रा,

Leave a Reply

Your email address will not be published.