- नागपुर समाचार, मनपा

स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी दिना निमित्त म.न.पा. व्दारा अभिवाद

नागपूर, ता. २६ : भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्त शंकर नगर चौक स्थित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाला नगरीच्या वतीने महापौर श्री.दयाशंकर तिवारी, झोन सभापती श्री. सुनील हिरणवार व ज्येष्ठ नगरसेवक श्री.संजय बंगाले यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
तसेच म.न.पा.मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दालनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्राला महापौर श्री. दयाशंकर तिवारी, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे व सत्तापक्ष नेता श्री. संदीप जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.