नागपूर : संक्रांतीच्या पर्वावर नागपुरात पतंगबाजी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजाविरोधात कारवाईसाठी मनपाने कंबर कसली आहे. मंगळवारी (ता. २९) चार झोनमध्ये केलेल्या नऊ कारवाईच्या माध्यमातून सुमारे नऊ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा वापराच्या बंदीबाबत एकीकडे जनजागृती होत असतानाच बाजारात काही व्यापारी त्याची विक्री करीत आहे. मनपा आयुक्तानच्या आदेशानुसार, अशा व्यापाऱ्यांवर मनपातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मंगळवारी (ता. २९) धंतोली झोनअंतर्गत एक, गांधीबाग झोनअंतर्गत सहा, सतरंजीपुरा झोनअंतर्गत एक आणि आशीनगर झोनअंतर्गत एक कारवाई करण्यात आल्या. या माध्यमातून नऊ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. १६४ नग प्लास्टिक पतंग जप्तीची कारवाईही करण्यात आली.