हर घर तिरंगा अंतर्गत आयोजित रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर समाचार : ‘भारत माता की जय’च्या जय घोषाने शहरातील प्रमुख चौक दुमदुमून गेले. निमित्त होते ते नागपूर महानगरपालिकाद्वारा आयोजित ‘तिरंगा बाईक रॅली’चे, केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारा शुक्रवारी (ता.८) तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली.
मनपा मुख्यालयातीतून प्रारंभ झालेल्या ‘तिरंगा बाईक रॅली’ ला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त वुसमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बाराहाते, उपायुक्त मिलींद मेश्राम, उपायुक्त गणेश राठोड, सहायक आयुक्त श्याम कापसे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, साप्रविचे अधीक्षक राजकुमार मेश्राम, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, शहरात देशभक्तीपर वातावरण निर्मितीसाठी मनपा कार्यरत असून, नागपूरकरांनी या अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवावा, तसेच प्रत्येकानी आपल्या घरावर तिरंगा लावावे असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले.
नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत आयोजित तिरंगा बाईक रॅलीला मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. शहरातील प्रमुख चौकातून मार्गक्रमण करणाऱ्या तिरंगा बाईक रॅलीला नागरिक स्वयंस्फूर्तीने जुळत गेले. सर्वात पुढे अग्निशमन विभागाचे वाहन त्यामागे उपद्रव शोध पथकाचे जवान आणि नंतर कर्मचाऱ्यांचा बाईक ताफा असे या तिरंगा बाईक रॅलीचे स्वरूप होते. तिरंगा ध्वज हाती घेऊन व भारत माता की जय असा जयघोष करीत मनपा मुख्यालयातून सुरुवात रॅलीला सुरूवात झाली. विधानसभा चौक होत संविधान चौक झिरो माईल चौक, सीताबर्डी चौक, महाराष्ट्र बँक चौक, झाशी राणी चौक, अलंकार चौक, शंकर नगर चौक, लॉ कॉलेज चौक, मो. रफी चौक, लेडीज क्लब चौक, रवी भवन चौक होत एसबीआय बँक ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीचे समापन झाले.