नागपूर समाचार : स्वावलंबी नगर आणि दीनदयाल नगर पररसरातील नागररकांना गेल्या 15–20 णदवसांपासून भेडसावत असलेली दूषित पाण्याची समस्या अखेर सुटली आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही दुर्लक्ष करणाऱ्या मनपा प्रशासनाला आमदार संदीप जोशी यांनी थेट इशारा दिल्यानंतर जलप्रदाय विभाग जागा झाला आणि योग्य दुरुस्ती करून स्वच्छ पाणी पुरवठा सुरू केला.
या दोन्ही परिरात गेल्या काही आठवड्यांपासून पाण्यात दुर्गंधी, गाळ आणि आरोग्याला अपायकारक अशा स्थितीमुळे नागरिक त्रस्त होते. तक्रारी केल्यानंतर कर्मचारी प्रत्यक्ष येत असत; पण केवळ थातूरमातूर काम करून
परत जात. परिणामी, समस्येचे मूळ कायम राहिले. अखेर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच ही स्थिती असल्याने आमदार संदीप जोशी यांनी नाराजी व्यक्त करत महानगरपालिका आयुक्तांना इशारा देणारे पत्र पाठवले.
या इशाऱ्यानंतर मनपाच्या जलप्रदाय णवभागाने तातडीने कारवाई करत दोषपूर्ण असलेल्या जलवाहिन्यांची तपासणी केली. काही भागात जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली, तर काही ठिकाणी ती पूर्णत: बदलण्यात आली. परिणामी, आता नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी पाणी मिळू लागले आहे.
या सकारात्मक बदलाबद्दल परिसरातील नागररकांनी आमदार संदीप जोशी यांना फोन करून आभार मानले आहेत. आमदार जोशी यांनीही आयुक्त तसेच जलप्रदाय विभागाचे अधीक्षक अभियंता यांचे नागरिकांच्या वतीने अभिनंदन करून आभार व्यक्त केले.
मात्र, एवढ्या तक्रारी करूनही प्रशासनाने वेळेवर कृती केली नाही, ही बाब खेदजनक असल्याचेही आमदार जोशी यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच नागरिकांना समस्यांसाठी इतकी धडपड करावी लागते, हे विचार करण्याजोगे आहे. यापुढे मनपा प्रशासनाने नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घ्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.