हिंदूत्ववादी संघटना करणार जनजागृती; काशीमध्ये केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयातील पदाधिका-यांसाेबत बैठकीत निर्धार
नागपूर समाचार : संपूर्ण देशभरात हिंदू विरोधी षडयंत्र रचले जात आहे.हिंदू समाजातील विविधतेत, विभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.देशाची एकात्मता नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.विश्व हिंदू परिषद ही हिंदू संघटना असल्याने देशाची एकात्मता अखंड ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असून,देशाला नशाखोरीच्या आहारी ढकलण्याचा देशद्रोहींचा कट असल्याचा आरोप आज पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केला.
काशी (वाराणसी) येथे १८ ते २० जुलै दरम्यान महत्वाची बैठक पार पडली. यात केंद्र सरकारच्या युवा व क्रीडा विभाग तसेच सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते असे त्यांनी सांगितले.या बैठकीत देशातील युवा पिढीला नशाखोरीच्या दरीत ढकलण्याच्या देशद्रोही षडयंत्रविषयी गंभीर चर्चा पार पडली असल्याचे परांडे म्हणाले.भारताच्या सीमावर्ती भागात तसेच देशातीलल प्रत्येक मोठ्या शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये अम्ली पदार्थांचे सेवन खूप मोठ्या प्रमाणात होत असलेले आढळून येत आहे.देशाबाहेरील शक्ती या मागे असून अंडरवर्ल्ड,गुन्हेगारांचा अाधार यासाठी घेतल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
एका सर्वेक्षणातून हे धक्कादायक सत्य समोर आले आहे की देशातील कोट्यावधी युवा पिढी ही अम्ली पदार्थांच्या आहारी गेली आहे.एकीकडे देश संपूर्ण प्रगतीच्या पथावर मार्गस्थ होण्याच्या प्रयत्नात असताना देशातील युवा पिढीलाच नशेच्या आहारी ढकलण्याचे काम देशविघातक शक्ती करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.केवळ महाविद्यालय नव्हे तर सहावी,सातवी,आठवीलतील शाळेय विद्यार्थी हे देखील त्यांचे लक्ष्य असल्याचे परांडे सांगतात.काशीच्या बैठकीत देशा समोर असलेल्या या धोक्यावर केंद्र सरकारच्या विविध मंत्राल्याच्या युवा विभागाने सहभाग नोंदवून गंभीर चर्चा केली.नशेचे कार्यक्षेत्र,मार्गदर्शन,नशेपासून देशातील युवा पिढीला मुक्त करण्यासाठी जनजागृतीपर घेण्यात येणारे कार्यक्रम इत्यादी बाबत सखोल चर्चा पार पडली असल्याची माहिती त्यांनी दिली.
हिंदूत्वावादी संघटना बजरंग दल तसेच दूर्गा वाहिनी यांना देखील या बैठकीचे निमंत्रण होते.बजरंग दलाशी देशभरातून ३२ लाख सदस्य तर दूर्गा वाहिनीसोबत १६ लाख मातृशक्ती जुळलेल्या आहेत.याशिवाय संत्संगाचे नेटवर्क २९ हजार स्थळांवर असून, हजारो सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून आमच्या संघटनेशी लोक जुळलेले आहेत.याशिवाय देशभरातील साधूसंत आमच्यासोबत जुळलेले असल्याने नशामुक्त भारत करण्यासाठी आम्ही या सर्वांच्या संपर्काचा उपयोग करणार असल्याची माहिती या प्रसंगी परांडे यांनी दिली.
मागील वर्षी बजरंग दलाने ‘रंग फॉर हेल्थ’हा यशस्वी उपक्रम राबविला होता.या वर्षी बजरंग दल नशामुक्त भारताचा विषय किमान पाच हजार भागात तर दूर्गा वाहिनी किमान चार हजार भागात पोहोचविण्याचे काम करेल.याशिवाय एका मोठ्या जनजागरणाचा देखील कार्यक्रम पार पडेल.देशातील युवा पिढीला नशाखोरीसाख्या गंभीर धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी या पूर्वी कोणीही असा कार्यक्रम राबविला नसेल असे सांगत,हा कार्यक्रम डिसेंबर महिन्या पूर्वी करण्याचा प्रयत्न राहील,असे ते म्हणाले.
नागपूरातच लकडगंज भागात एका गुजराती कुटूंबातील पंधरा वर्षीय मुलीला घरातून ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न काही मुस्लीम युवकांनी केला.त्यांना अडवित असताना मुलीच्या आईवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.लकडगंज पोलिस ठाण्यात या विरोधात एफआयआर दाखल झाली आहे.या प्रकरणात खोट्या पोलिसांचा देखील सहभाग आढळला.मुस्लिम वर्गामध्ये असले प्रकार वाढत असून नागपूरात महाल परिसरात झालेल्या दंगलीत या धर्मातील मोठा वर्ग दंगलीत सहभागी झाला होता.अलीकडे त्यांचे दु:स्साहस वाढत असून घरात घूसून आता ते मुलींना पळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून पडत आहे.मुस्लिम धर्माचे नेतृत्व करणा-यांनी त्यांच्या धर्मातील यूवा पिढीला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे,समाज विघातक कृत्यांपासून त्यांना परावृत्त केले पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.अशाच घटना केरळमध्ये देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे ते म्हणाले.
केरळमध्ये मोठ्या प्रमाणात ईसाई धर्मातील मुलींचे धर्मांतर झाले असून केरळच्या गृहमंत्र्यांनीच याची कबुली दिली आहे. २०१५ ते २०१९ या काळात किती तरी हजार मुलीं लव्ह जेहादला बळी पडल्या.मुस्लिम धर्मातील नेतृत्वाने हे थांबवायला हवे अन्यथा त्या नेतृत्वालाच बाजूला सारले गेले पाहिजे,असे परांडे याप्रसंगी म्हणाले.
नागपूरसारख्या शहरात देखील हेतूपुरस्सर लोकसांख्यकीक बदल घडवून आणले जात असून बांग्लादेशातील २५ हजारच्या वर अवैधरित्या घूसपैठीयांनी आश्रय घेतला आहे,असे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे,यावर प्रश्न केला असता, केवळ नागपूरच नव्हे तर पश्चिम बंगाल सहित संपूर्ण देशातच हीच मोडस ओपरेंडी अमलात आणली जात असल्याचे ते म्हणाले.पश्चिम बंगालमधील चोवीस परगणा असो किवा अंदमान असो.या मागील तंत्र आमच्या देखील लक्षात आले असल्याचे ते म्हणाले.यावर प्रश्न उपस्थित केला असता तृणमूल काँग्रेस खोटा नेरेटीव्ह सेट करुन, हा प्रहार धर्मावर नसून बंगाली भाषिकांवर असल्याचे सांगते .मूळात आक्षेप बंगाली भाषिकांवर नसून देशात अवैधरित्या घूसखोरी करणा-यांवर असल्याचे परांडे म्हणाले.
‘धर्मनिरपेक्ष व समाजवाद’ हे शब्द संविधानाच्या मूळ प्रास्ताविकेत नाहीत मात्र,आणिबाणिच्या काळात ४२ वे संशोधन करुन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे दोन्ही शब्द प्रास्ताविकेत घूसवले,मूळात देशातील धर्मपरिवर्तनामागे धर्मनिरपेक्षता या शब्दाचा किती सहभाग आहे?हा शब्द संविधानात असावा कि नसावा?याबाबत प्रश्न केला असता,देशातील अत्यंत ज्ञानी व बुद्धिमान लोकांनी संविधानाची निर्मिती केली असल्याचे उत्तर परांडे यांनी दिले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची नींव रचली असून संविधान सभेत देखील ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द लिहले गेले पाहिजे का इत्यादी अश्या विषयांवर गंभीर चर्चा झाली.त्यावेळी संविधान सभेत डॉ.आंबेडकरांसह कोणीही याचे समर्थन केले नाही.डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी देखील याचा विरोध केला.त्यावेळी देशातील त्या तज्ज्ञांना संविधानाला कोणत्याही अश्या शब्दात अडकून ठेवण्याऐवजी मुक्त ठेवायचे होते.आपल्या संविधानकर्त्यांनी ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द खूप चर्चेनंतर आणि खूप विचारपूर्वक ‘अस्वीकार’ केला होता.
मात्र,आणिबाणिच्या काळात हे दोन्ही शब्द संविधानाच्या मूळ प्रस्तावनेत जोडण्यात आले ते ही अश्यावेळी जेव्हा देशाची संसद ही कार्यरत नव्हती ती बर्खास्त करण्यात आली होती.आता देशात धर्मनिरपेक्षता व समाजवाद या शब्दांबाबत एक वैचारिक प्रक्रिया सुरु झाली आहे.हे दोन्ही शब्द लोकतांत्रिक पद्धतीनी समाज व देशाला विश्वासात घेऊन संविधानाच्या मूळ प्रास्ताविकेत जोडण्यात आले नाही.त्यामुळे यावर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी अनेक लोक करीत असल्याचे ते म्हणाले.
या दोन्ही शब्दांविषयी देशात चर्चा सुरु झाल्यास मला वाटतं ती योग्य दिशेला जाईल.मूळात संविधान हे देशातील समाजासाठीच ,समाजाला समोर ठेऊनच निर्माण झाले असल्याने संविधान धुरीणांना ‘समाजवाद’हा शब्द देखील त्यात टाकण्याची गरज भासली नाही.ज्यावेळी ही चर्चा देशात घडेल, हे दोन्ही शब्द कश्यारितीने संविधानात घूसवण्यात आले,कोणत्या उद्देशाने टाकण्यात आले,संविधान निर्मितीच्या वेळी या दोन्ही शब्दांची गरज संविधाननिर्मात्यांना का भासली नाही,ही चर्चा जसजशी समाजात होईल तेव्हा योग्य गोष्टी आपोपात घडतील असं मला वाटतं,असे परांडे म्हणाले.