नागपूर समाचार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पात्र महिला लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षांचे वितरण करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार आशिष देशमुख, आमदार संदीप जोशी, सचिव अनुपकुमार यादव व अन्य मान्यवर उपस्थित होते.
महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांद्वारे महिलांसाठी संचालित पिंक ई-रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेतील ५० पात्र महिला लाभार्थ्यांना रिक्षा वितरणप्रसंगी केले.
‘पिंक ई-रिक्षा वितरण समारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार आशिष देशमुख यांनी या पिंक ई-रिक्षामधून प्रवास केला.
सोहळ्यास एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त नयना गुंडे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, नागपूर जिल्हाधिकारी विपिन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.