दीक्षाभूमीवर शौर्य दिनी मानवंदन
नागपूर समाचार : भीमा कोरेगावची लढाई ही आत्मसन्मान आणि स्वाभीमानाची होती असे मत दीक्षाभूमीवर आयोजित शौर्य दिनानिमीत्ताने आयोजित एका समारंभात मान्यवर वक्त्यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, आणि जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे सदस्य विलासगजघाटे होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार, लेखक प्रभाकर दुपारे, कमलताई भगत, रोशनी गायकवाड, मीनाताई मून, रंजना वासे, प्रा, सुभाष शेंडे, यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. यावेळी बोलतांना गजघाटे म्हणाले की, भीमा कोरेगाव ची लढाई ही ईतिहासात अजरामर घटना आहे. भीमा कोरेगाव मध्ये लढलेल्या सैनिकांचे शौर्य आजही समाजाला प्रेरणा देत राहिल. समाजाने आज एकसंघ राहणे ही काळाची गरज आहे. दीक्षाभूमीवर यापुढेही दीक्षा समारंभा व्यतीरिक्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक शरद मेश्राम यांनी केले तर आभार राभाऊ बागडे यांनी मानले, कार्यक्रमाच्या आयोजनात देवाजी रंगारी, मधुकर मेश्राम, सुनील भोसले, सतीश वाहने, प्रदीप मून, गौरीशंकर श्रावणकर, सुरेश वानखेडे, सुरेश गेडाम, कैलाश राव, गौतम घुपे, मीना खैरकर, माध्यमा सवाई, यशोधरा श्रावनकर, रंजना विमल रामटेके, विद्या मून उपस्थित होत्या.