नागपूर समाचार : ‘एक वोट से क्या ही फर्क पडता है…’ असे म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी एँजाय करण्याऐवजी आपल्या मताचा नव्हे आपल्या अधिकाराचा वापर करून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवा, देशाच्या निर्मितीत योगदान देउन ‘एक वोट से ही फर्क पडता है…’ असे दाखवून द्या, असा संदेश फ्लॅश मॉब आणि पथनाट्याद्वारे युवकांनी दिला.
सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासन यांच्याद्वारे मंगळवारी (ता.२) सीताबर्डी मेट्रो इंटरचेंज येथे मॅट्रिक्स वॉरियर्सच्या स्वयंसेवकांनी फ्लॅश मॉब आणि पथनाट्याचे सादरीकरण केले. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा निवडणूक नोडल अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा, पोलीस उपायुक्त श्री राहुल मदने, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन, मनपा उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. मिलींद मेश्राम, उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी युवकांनी निवडणूक आयोगाचे अँम्बेसेडर म्हणून कार्य करावे तसेच 19 एप्रिल रोजी स्वतः मतदानाचा हक्क बजावावा सोबतच इतरांना देखील मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मॅट्रिक्स वॉरियर्सच्या युवकांद्वारे करण्यात आलेल्या सादरीकरणाचे कौतूक केले व युवकांनी मतदानासाठी पुढे येऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले. जिल्हा निवडणूक नोडल अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांनीही मतदानाची टक्केवारी वाढविण्यात युवकांची भूमिका असल्याचे सांगत त्यांनी जास्तीत जास्त युवकांनी या जनजागृती मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थितांनी मतदान करण्याची शपथ घेतली.

सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नागपूर शहरातून जास्तीत जास्त मतदान व्हावे व ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता मंगळवारी (ता.२) सीताबर्डी मेट्रो इंटरचेंज येथे युवकांनी मतदानाचा जागर केला. ‘स्वीप’ अंतर्गत मॅट्रिक्स वॉरियर्सच्या स्वयंसेवकांनी फ्लॅश मॉबद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, देशभक्तीपर गीत अशा विविध गीतांमधून नागरिकांचे लक्ष वेधले व पुढे ‘मतदान कर…’ अशी साद देखील घातली. तसेच पथनाट्याद्वारे मतदान का आवश्यक आहे, हे देखील पटवून दिले.
मॅट्रिक्स वॉरियर्स संस्थेतर्फे पथनाट्याचे लेखन नंदिनी मेनजोगे यांनी केले तर संकल्पना आदित्य खोब्रागडे यांची होती. संस्थेचे आकाश निखाडे, सर्वेश हरडे, सुजाता कावरे, संजना मानवटकर, कुणाल पवार, आदर्श दुधनकर, नयन हावरे, प्रशांत बेलसरे, पलाश हेडाऊ, रोशन वांढरे, जान्हवी वांढरे, वृषाली भानारे, साक्षी सारडा, निखिल दुधनकर, आचल पौनीकर, विनीत चांडक, गौरी रुद्राकर, चेतन दुधनकर, मोहिनी जंगले, समीक्षा जंगले या स्वयंसेवकांनी पथनाट्य व फ्लॅश मॉबमध्ये सहभाग नोंदविला. नागरिकांनी देखील या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.




Po przejściu rejestracji gracz otrzymuje prawo do bonusu bez depozytu w wysokości 100 darmowych spinów. Taki prezent pozwala ocenić usługi Vavada Casino i spróbować szczęścia na automatach bez inwestowania pieniędzy. W tym przypadku wygrana po spełnieniu warunków obrotu może zostać wypłacona lub wykorzystana do dalszej gry. Pakiet powitalny to nie jedyna oferta bonusowa na oficjalnej stronie kasyna Vavada. W sekcji z opisem promocji można znaleźć bonusy dla stałych graczy, a informacje o wygranych są gromadzone w profilu klienta.