- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणे अतिशय गुंतागुंतीचे कार्य – किशोर भोयर यांचे प्रतिपादन

आजी व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम, डॉ. सोनूताई अग्निहोत्री कर्ण बधिर निवासी शाळा

नागपूर समाचार : दिव्यांग विद्यार्थ्यांची काळजी घेणे व त्यांना घडविणे हे अतिशय गुंतागुंतीचे काम आहे. हे काम शाळेचे प्रमुख किती कौशल्यापूर्वक हाताळतात याचे उत्तम उदहारण आज बघायला मिळाले. त्यामुळे असे उपक्रम प्रत्येक शाळेतून राबविण्यात यावे, असे प्रतिपादन समाजकल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी केले. डॉ. सोनुताई अग्निहोत्री मूकबधीर निवासी शाळेच्या वतीने आजी व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम शाळेच्या

प्रांगणात नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी, सक्षम संस्थेचे प्रकल्प प्रमुख दीपक अमिन, डॉ. सोनू अग्निहोत्री, विजय गडकरी, संस्थेचे अध्यक्ष वामन जोशी, उपाध्यक्ष विनोद जोशी, सुरेश देव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कांचन गडकरी यांनी शिक्षक व

कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाचे आणि विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचे कौतुक करीत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही यावेळी दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना शाळेच्या प्रगतिशील वाटचालीवर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले गडकरी दाम्पत्याचे तैलचित्र कांचन गडकरी यांना भेट देण्यात आले. शाळेचा माजी विद्यार्थी यश चांडक याने शाळेतील शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपदा तुंबडे यांनी तर संचालन प्राजक्ता देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *