- Breaking News, खेलकुद , नागपुर समाचार

नागपूर समाचार : एकल अभियान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा प.बंगालचा शुभा विश्वास, आसामची रिशा सैकायी प्रथम

नागपूर समाचार : पश्चिम बंगालचा शुभा विश्वास आणि आसामची रिशा सैकायी यांनी मुले व मुलींच्या 100 मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक पटकाविला. एकल अभियान अभ्युदय युथ क्लबच्या वतीने आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये दोन्ही खेळाडूंनी यश संपादित केले.

अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या क्रीडांगणावर शनिवारी (ता.20) पार पडलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये मुलांच्या 100 मीटर शर्यतीत पश्चिम बंगालच्या शुभा विश्वासने 12.27 सेकंदाची सर्वोत्तम वेळ नोंदवित पहिले स्थान प्राप्त केले. त्यापाठोपाठ उत्तराखंडच्या अमर सिंगने 12.57 सेकंद आणि दक्षिण बिहारच्या विक्की कुमारने 12.74 सेकंद ही वेळ नोंदवित दुसरे व तिसरे स्थान पटकाविले.

मुलींच्या गटात आसामच्या रिशा सैकायीने 14.05 सेकंदात 100 मीटर अंतर गाठून पहिला क्रमांक पटकाविला. यापाठोपाठ पश्चिम बंगालची श्रुती सताराने 14.36 सेकंद आणि पश्चिम उत्तरप्रदेशच्या दिव्यांशी ने 14.66 सेकंदाच्या वेळेसह दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *