- Breaking News, नागपुर समाचार

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस, शिवसेना पक्षाचे सरपंच व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

ना.देवेंद्र फडणविस यांची भेट घेत मा. आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन परिसरातच झाला पक्ष प्रवेश

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

आज दि.१३ रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील येथील महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचे नेतृत्वात थेट विधानभवन परिसरातच भाजपा प्रवेश केला.

विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश करीत आहेत.

सदर प्रवेश थेट विधान भवन नागपूर येथे दि.१३ रोजी आ. समीर कुणावार यांचे नेतृत्वात करण्यात आला.

याप्रसंगी प्रामुख्याने ललित डगवार पाणी पुरवठा सभापती, सुशीला लढी सभापती नगरपंचायत महिला बालकल्याण, रवींद्र लढी शिवसेना प्रमुख , कमलेश भोयर उपसरपंच साखरा ,रमेशराव मडावी सरपंच परडा, संजय शेळकी धपकी , सौ. नीता शेळकी सरपंच धपकी , प्रल्हाद नांदुरकर ग्रामपंचायत सदस्य परडा, नामदेवराव उमाटे समुद्रपूर, नारायणराव बादाने पारोधी, विनायकराव मोंढे अंतरगाव, संदीप देरकर शहराध्यक्ष काँग्रेस इत्यादी कार्यकर्त्यांना रितसर भाजपात प्रवेश देण्यात आला. प्रवेश केलेल्या सर्व नवोदित पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणविस व मा. आमदार समीर कुणावार यांनी पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

उपरोक्त कार्यक्रमाचे वेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, हिंगणघाट विधानसभा प्रमुख संजय डेहणे, माजी नगरपंचायत अध्यक्ष समुद्रपूर गजानन राऊत , माजी पंचायत समिती उपसभापती योगेश फुसे , रामभाऊ काळे, कवीश्वर इंगोले, भारतीय जनता युवा मोर्चा हिंगणघाट शहराध्यक्ष सोनू पांडे, तुषार हवाईकर इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *