- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : खासदार सांस्कृतिक महोत्सवात संविधान दिनी परित्राण पाठ – ऍड. धर्मपाल मेश्राम

51 पूज्य भन्तेजी देणार बुद्धांच्या मानवतेचा संदेश

नागपूर समाचार  : केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होणार असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी ‘परित्राण पाठ’चे आयोजन करण्यात येत आहे. या परित्राण पाठच्या आयोजना संदर्भात माजी नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

बैठकीत माजी नगरसेवक श्री. संदीप गवई, श्री. सतीश सिरसवान, श्री. आशिष वांदिले, श्री. सुधीर जांभुळकर, श्री. भैय्यासाहेब दिघाने, वंदना भगत, श्री. नागेश सहारे, श्री रमेश वानखडे, श्री.नेताजी गजभिये, सौ. उषाताई पॅलेट, श्री. शंकर मेश्राम, श्री. महेंद्र प्रधान, श्री. इंद्रजित वासनिक, श्री हिमांशू पारधी आदी उपस्थित होते.

क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानामध्ये 26 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजता परित्राण पाठ आयोजित करण्यात आले आहे. 51 पूज्य भन्तेजी मानवी कल्याणाचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा संदेश या परित्राण पाठ च्या माध्यमातून नागपूरच नव्हे तर संपूर्ण देशभर प्रसारित करतील. बैठकीत माजी नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी कार्यक्रम अधिकाधिक प्रमाणात यशस्वी करण्याविषयी संबोधित केले. नागपूर शहरातील सर्व बौद्ध विहारांमधील पूज्य भन्तेजींचे मार्गदर्शन घेऊन कार्यक्रमाबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

ऍड. मेश्राम यांच्यासह श्री. अशोक मेंढे, डॉ. मिलिंद माने, श्री. संदीप जाधव, श्री. संदीप गवई, श्री. सतीश सिरसवान, प्रमोद तभाने, नागेश सहारे, वंदना भगत, आशिष वांदिले व संपूर्ण टीम आयोजनासाठी परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *