- Breaking News, नागपुर समाचार, सामाजिक 

नागपूर समाचार : दिव्यांग जोडप्यांचे लग्न संपन्न

नागपूर समाचार : आज दिनांक 21/08/2023 ला विवाह नोंद कार्यालय नागपूर, जिल्हा नागपूर येथे विवाह संपन्न झाले. श्रीमती सुनंदा पुरी, दिव्यांग समाज सेविका, प्रोग्रेसिव्ह फेडरेशन ऑफ व्हिजीवली चॅलेंज या संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारीणी, यांच्या प्रयत्नातून वधू जरीना मंडपे रा. गौडखैरी, नागपूर व वर आयुष्यमान मेश्राम रा. चंद्रपूर या दोन्ही अंध दांपत्यांचे लग्न पार पडले.

या कार्यक्रमात सुनंद पुरी, बादल कापसे, अॅडवोकेट लिखीत मेश्राम, मसराम, मनोज मंडपे, सौ श्रेया मंडपे, प्रियंका मंडपे, कपील बागडे यांच्या उपस्थित पार पडले. त्यानंतर नव दांपत्यांचे अभिनंदन करून भावी आयुष्याचे शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *