- Breaking News, नागपुर समाचार, सामाजिक 

नागपुर समाचार : कंजंक्टिवायटिस या डोळ्याची लक्षणे पाहता भारतीय जनता युवा मोर्चा द्वारे चष्मे वाटप

नागपूर समाचार : सध्या संपूर्ण नागपूर शहरात कंजंक्टिवायटिस हि डोळ्याची साथ पसरत आहे. त्याअनुषंगाने संजय नगर, पांढराबोडी ह्या स्लम वस्तीत गोर गरिबांना व अनेकांना ह्या रोगाने ग्रासले आहे. तेथील नागरिकांना व लहान मुलांना प्रथम उपचार सोयी अभावी दवाखान्यात जाणे परवडत नाही.

हि गंभीर बाब ! जेव्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व्ही एन रेड्डीना समजले तसेच ते तातडीने मदतीस धावून आले, त्यांनी या आजाराची लक्षणे व उपाय सांगून तेथील आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असलेल्या नागरिकांना व लहान मुलांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात पसरू नये म्हणून चष्मे वितरित केले.

ह्यामध्ये लागण झालेल्यांमध्ये दोन वर्षा पासुन तर अगदि 75 वर्षा पर्यंतच्या नागरिकांना डोळे आलेले आहेत, व्ही एन रेड्डी यांनी लहानांपासून तर अगदी 75 वर्षाच्या आजी पर्यंत चश्मे वाटप केले. तेथील नागिकांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रेड्डी यांचे आभार व्यक्त करून धन्यवाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *