- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : मोरया फाउंडेशन तर्फे सावन महोत्सव उत्साहात

मोरया फाउंडेशनचा उपक्रम मिस आणि मिसेस सावन क्वीन 2023 -सौंदर्य स्पर्धेचे आयोजन संपन्न

नागपूर समाचार : मोरया फाउंडेशन तर्फे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात रविवारी ३० जुलै ला सावन महोत्सव विष्णुजी की रसोई येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्रीमती कांचनताई गडकरी कार्यक्रमच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमांची सुरवात दीप प्रज्वलनाने झाली. फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाशजी चौहाण, श्रीमती नेहाताई लागाटे, सुरेश चावरे यांनी दीपप्रज्वलन केले.

याप्रसंगी द ब्लाइंड बॉईज इन्स्टिट्युट येथील नेत्रहीन विद्यार्थ्यांना मोरया फाउंडेशन च्यावतीने पांढरी छडी (white cane stick) कांचनताई गडकरी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. कांचनताईंनी स्री शक्तीचे यावेळी गुणगान केले व प्रतीयोगीते साठी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्यात. सावन महोत्सव या कार्यक्रमात मिसेस सावन क्वीन आणि जोडी नंबर वन या प्रतियोगिता आयोजित केल्या होत्या.

यावेळी जुरी सदस्य सौ. वैशाली ठाकूर, सौ. नेहा गोडबोले, सौ.नेहा बिसेन, सौ.सोनाली पवार यांनी विजेत्यांची निवड केली. मिसेस सावन क्वीन विनर सौ.रिंकी वासनिक, फर्स्ट रनर अप …..सेकंड रनरअप सौ. अश्विनी मोरे तर जोडी नंबर वन च्या विजेत्या सौ. मनीषा भोयर व चेतना हिंगे (ननद + भावजय) फर्स्ट रनर अप सौ. उज्वला बोडखे व प्रियांका घरडे (सखी सहेली) सेकंड रनरअप सौ. सपना फेद्देवार व राही फेद्देवार (आई व मुलगी) या जोडीचा विजय झाला. मोस्ट स्टायलिश सौ. शुभांगी नांनवटकर, मोस्ट फॅसिनेटीग हे title सौ. श्रुती राऊत हिने पटकावले सर्व विजेत्यांना मोरया फाउंडेशनच्या रजनीताई चौहाण यांनी क्राऊन, साश, ट्रॉफी, गिफ्ट व्हाउचर देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिलां येथे उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. माधुरी ईट्टेडवार, सौ. मनीषा भोयर, सौ. चेतना हिंगे, सौ.सुवर्णा रहाटे, सौ. वैशाली नंदांनवार, सौ.नंदा खापेकार, शार्दुल चौहाण इत्यादींचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *