- PRESS CONFERENCE, विदर्भ

चंद्रपूर समाचार : आम आदमी पार्टी चंद्रपूर कडून समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

चंद्रपूर समाचार : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे शिलेदार कष्टकरी मजुरांची लढाई लढणारे, रशिया सारख्या देशात जाऊन भारताचे नाव लौकिक वाढवणारे समग्र क्रांतीचे स्वप्न घेऊन चळवळ चालवणारे दीड दिवस शाळा शिकून 35 कादंबऱ्या तीन प्रवास वर्णन साथहून अधिक नाटके एवढा मोठा लिखाण प्रपंच मराठी साहित्य क्षेत्रातील साहित्य सम्राट महाराष्ट्रासाठी भूमिगत होऊन डफ हाती घेऊन आपल्या शाहिरीतून समाज प्रबोधन करणारे आपल्या लिखाणातून वंचित घटकात राहणाऱ्या नायक व नायिका व्यवस्थेची कशा प्रकारे लढतात त्या लढण्यातून अनेक सत्य घटना मांडणारे प्रबोधनकार लेखक कवी अशा एक ना अनेक भूमिका साकारणारे कॉम्रेड लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती आज शाहीर अण्णा भाऊ साठे चौक घुतकाळा चंद्रपूर येथे आम आदमी पार्टी चंद्रपूर कडून साजरी करण्यात आली आहे.

ह्या प्रसंगी आप चे नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, अल्पसंख्याक आघाडी जिल्हा अध्यक्ष नासिर शेख, चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महिला शहर अध्यक्ष सुनीता पाटील, शहर उपाध्यक्ष सुनील सदभाय्या, शहर सहसंघटन मंत्री सिकेंदर सगोरे, शहर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, नागसेन लाभाने, भीमराव मेंढे, मीना पोटफोडे, रूपा काटकर, जास्मिन शेख, मनीषा पडगिलवार, तब्बसूम शेख, ज्योती संगेवार, स्वाती डोंगरे, पुष्पा बुधवारे, साधना पाटील, पार्वताबाई पोटफोडे, सुंदराबाई पोटफोडे, बेबीबाई मंगले, इच्छा पोटफोडे, ताई बाई डोंगरे, चंद्रकला डोंगरे, श्रुती पोटफोडे, बकुबाई गवई, अन्नपूर्णा डोंगरे,वामन आमटे, विजय आमटे, सुनील डोंगरे ईत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *