- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : दक्षिण नागपूरातील अमरनगर रोडची दुर्दशा

नागपुर समाचार : दक्षिण नागपूर प्रभाग ३४ येथील चिखलीरोड, अमरनगर कडे जाणाऱ्या रोडची अत्यंत दुर्दशा खराब झाली आहे. तेथील दोन महिन्यापासून मोठ्या पाईपलाईनचे काम सुरू होऊन ते संपन्न झाले. खोदकाम केलेल्यावर पाईपलाईन झाकल्यानंतर माती ओसांड पडलेली आहे. एका बाजूने ट्राफिक जाणं व येणं करतंय त्यामध्ये खूप लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. करिता या कामाकडे मनपाने लक्ष वेधून नागरिकांच्या सोयीसाठी दुरुस्ती करिता पाऊल उचलावे.

गेल्या दोन महिन्यापासून काम झाले असून अशीच बिकरलेली माती रोडवर पडली आहे. या रोडवर अपघात होण्याची शक्यता आहे. पंधरा दिवसांपूर्वी पाऊस पडला त्यावेळेला खुपच चिकल झालेला होता. मान्सून तोंडावर येऊन पडलाय तरीही रोडचं काम ठप्पच आहे. कधी करणार हे काम ? किती दिवस सहन करणार नागरिक ? हा प्रश्न निर्माण होतोय. रोडवरील जाणारे येणाऱ्याच्या गाड्या स्लीप होऊन काही लोकांना इजा पोहोचली आहे.

आजही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना रोज चा त्रास सहन करावा लागत आहे. याकरिता या भागातील माजी नगरसेवक याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि त्यांच्या पर्यंत गेलो तर काय करणार हे सगळं प्रशासन करीत आहे. असे सांगण्यात येते. मग कुणा कडे दाद मागायची हेच कळत नाही ? म्हणून या रोडवरील महाकाली नगर, सरस्वती नगर, अमरनगर, न्यु अमर नगर, अध्यापक नगर, शिवशक्ती नगरातील नागरिकांनी मान्सून येण्याच्या आधीच रोड दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *