- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : भाषेच्या एकात्मिकतेसाठी वि. सा. संघाचा ‘भाषा सखी’ उपक्रम स्तुत्य – डॉ. वेदप्रकाश मिश्रा 

डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या प्रकट मुलाखतीत भाषा आणि साहित्य संबंधीअनेक आठवणींना उजाळा 

नागपूर समाचार : हिन्दी, गुजराती, उर्दु, तामिळ, बंगाली, इंग्रजी, संस्कृत अशा मराठेतर भाषांमधील दर्जेदार महत्वाचे साहित्य मराठी साहित्यिक आणि वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न हा वि. सा. संघाच्या ‘ भाषा सखी’ अंतर्गत करण्यात येणार आहे. भाषेच्या एकात्मिकतेसाठी वि. सा. संघाचा ‘ भाषा सखी’ उपक्रम स्तुत्य असल्याचे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ञ, साहित्ययिक आणि वक्ते डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले. ‘ भाषा सखी’ उपक्रमाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांची प्रकट मुलाखत घेण्यात ज्येष्ठ आकाशवाणी उद्घोषिका श्रध्दा भारद्वाज यांनी घेतली त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ साहित्य संघाच्या ‘ अमेय दालन ‘ येथे हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.  

विदर्भ साहित्य संघ शताब्दी वर्ष आणि नागपूरातील साहित्यिक यांचा गौरवपूर्ण उल्लेख करून राम शेवाळकर यांनी आपल्याला वक्तृत्वाचा उत्तराधिकारी हा मान दिल्याच्या भावनिक क्षणाला त्यांनी उजाळा दिला. वरोरा इथं ‘महाभारतातील कुंती’ या विषावर तू बोल असे शेवाळकर यांनी मिश्रा यांना सांगितले आणि मिश्रा यांचे अचंबित करणारे सखोल अभ्यासपूर्ण वक्तृव ऐकून शेवाळकरांनी मिश्रा यांना आपला वक्तृत्व उत्तराधिकारी जाहीर केले होते. 

याशिवाय आपण नागपूरकर असल्याचा अभिमान असल्याचे सांगत आपल्याला लहानपणा पासून उत्तम शिक्षक लाभल्याने आपण घडलो असे त्यांनी विनम्रतेने मान्य केले. साहित्यात रुचीअसल्याने तुलसीदास, दुष्यंतकुमार, आचार्य चतुरसेन यांचे साहित्य वाचल्याचे ते म्हणाले. 

 कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, उपाध्यक्ष राजेंद्र डोळके, सचिव विलास मानकर , लेखक रवींद्र शोभणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन विवेक अलोणी यांनी केले. 

चौकट: भारतातील वैद्यकीय शिक्षण श्रेष्ठ 

येत्या २०२४ च्या जुलै महिन्या पर्यंत भारत हा सर्वाधिक प्रशिक्षित मनुष्यबळ देणारा देश ठरणार आहे. भारताचे वैद्यकीयशिक्षण प्रगत आणि श्रेष्ठ आहे असे मत डॉ. मिश्रा यांनी व्यक्त केले. जितके रुग्ण एखाद्या प्रगत देशाचा डॉक्टर आपल्या पूर्ण आयुष्यात तपासात नाही तितके रुग्ण आपल्या देशात अंडरग्रॅजुएट वैदकीय शिक्षण घेणारा बघतो आणि त्यामुळे त्याच्या व्यापकतेचा परीघ मोठा असतो असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *