- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

विदर्भ समाचार : जय महाकाली शिक्षण संस्था द्वारा संचालित अग्निहोत्री महाविद्यालयात स्थापित विदर्भातील सर्वात मोठे व सर्व अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज ऑनलाईन परीक्षा केंद्र

विदर्भ समाचार : ऑनलाइन शिक्षण व परीक्षा हा जगभरातील शिक्षण क्षेत्रातील आसन्न ट्रेंडपैकी एक आहे. शिकण्याची ही पद्धत इंटरनेटद्वारे केली जाते. प्रगत तंत्रज्ञानामुळे शिकण्याचा मार्ग सोपा झाला आहे. उच्च शैक्षणिक संस्थांमध्येही ऑनलाइन शिक्षणाला व परीक्षेला प्राधान्य दिले जाते.

सध्याच्या परिस्थितीत शिक्षण घेण्यासाठी ऑनलाइन शिक्षण हा एक व्यवहार्य पर्याय बनला आहे. गेल्या पाच वर्षांत ऑनलाइन शिक्षणाला व परीक्षेला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

शिक्षण हा आपल्या जीवनाचा मूलभूत आधार आहे, प्रत्येक नागरिकाला दर्जेदार शिक्षण मिळायला हवे, हा त्यांचा मूलभूत अधिकार आणि गरजही आहे. उत्तम करिअरचा पाया उत्तम शिक्षणाच्या जोरावरच घातला जाऊ शकतो. भारतीय शिक्षण पद्धतीचे आपण तीन भागात विभाजन करू शकतो. प्राचीन शिक्षण, वसाहती काळातील शिक्षण आणि आधुनिक भारताचे शिक्षण.

स्वातंत्र्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या क्रांतिकारी बदलांमुळे शिक्षणाचे स्वरूप पारंपारिक ते आधुनिक असे आधुनिक स्वरूप धारण केले आहे. सध्याच्या काळात ई-शिक्षण म्हणजेच ऑनलाइन शिक्षण खूप लोकप्रिय होत आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून दूरवर बसलेले शिक्षक ऑनलाइन प्लॅटफॉर्म अॅप्स, स्काईप, झूम, यूट्यूब आदींच्या मदतीने इंटरनेटच्या माध्यमातून मुलांना शिकवत आहेत.

बहुतेक सर्वच क्षेत्रातील मग ते सरकारी असो वा खाजगी नोकऱ्या करीता तसेच विविध कोर्सेस ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातात.

या परीक्षा ह्या ऑनलाईन परीक्षा केंद्रावर घेतल्या जातात. या सर्व बाबींचा विचार करून अग्निहोत्री कॉलेजच्या प्रांगणात एक भव्य व सर्व सोयींनी सुसज्ज, प्रसन्न वातावरण व रमणीय परिसरात विदर्भातील सर्वात मोठे ऑनलाईन परीक्षा केंद्र स्थापित करण्यात आले आहे. या परिक्षा केंद्रावर विविध प्रकारच्या परीक्षा सतत सुरू असतात व शेकडो विद्यार्थी दररोज या परिक्षाकेंद्रामधून परीक्षा देत असतात व विद्यार्थ्यांच्या रांगा लागलेल्या असतात. विद्यार्थी व पालक येथील अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज,प्रसन्न वातावरण व रमणीय परिसर पाहून भारावून जातात व समाधान व्यक्त करतात.

विद्यार्थ्यांनी या सुसज्ज ऑनलाईन परीक्षा केंद्रांचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल करून देशाचा बहुमान उंचवावा अशी प्रतिक्रिया जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *