- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : राशी पारधी हिला 2023 चा कलाभूषण बाल पुरस्कार बहाल

नागपुर समाचार : कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडिया च्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक नृत्यदिनी, बाल कलाभुषण जागतिक नृत्या दिनाच्या निमित्ताने 29 एप्रिल 2023 रोजी रेशीमबाग येथे सुरेश भट सभागृहातील नुकत्याच झालेला आयोजित कार्यक्रम कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडिया च्याविद्यमाने नृत्य कलाभुषण बाल पुरस्कार 2023 या कार्यक्रमात माऊंट फोर्ट स्कूल अशोकवन इयत्ता 5 वीची विद्यार्थिनी कु. राशी सचिन पारधी हिला कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडियाचे डायरेक्टर कुणाल आनंदम यांच्या हस्ते नृत्य कलाभुषण या पुरस्काराने गौरविण्यात आले.

भारत देशातून आलेल्या अनेक स्पर्धांकांपैकी राशीची निवड करण्यात आली. ती या यशाचे श्रेय तिचे नृत्य गुरूवर्य मनिष पाटील व जय हरणे आणि किशन वर्मा यांना देते. तसेच तिच्या या यशामागे तिच्या आई वडिलांचा विशेष योगदानचा मोठा वाटा आहे. वरील स्तरावरील कु.राशि पारधी वरील अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थीगण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *