- Breaking News, नागपुर समाचार

हिंगणघाट समाचार : पक्षप्रवेश कार्यक्रमाचेवेळी आ.कुणावार यांचे उपस्थितीत भाजयुमोच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात आ. समिर कुणावार यांचे नेतृत्वात भाजपा प्रगती पथावर असून आ. समिर कुणावार यांची कार्यशैली पहाता नवीन युवा कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सतत वाढत असल्याचे दिसून येत आहे.

काल दि.३० एप्रिल रोजी रोहित हांडे यांचेसह शेकडो युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चात रितसर प्रवेश घेतला.

याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये खालील कार्यकर्त्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

यावेळी शहर महामंत्री म्हणून तुषार येनोरकर, स्वप्निल सुरकार , शहर सचिव समीर गांधी, विधानसभा उपाध्यक्ष सनी बासनवार, विधानसभा अध्यक्ष अक्षय थुटे, युवती प्रमुख म्हणून मोनिका कापसे, युवती सचिव दिक्षा कळमकर , युवती सहप्रमुख सारिका बाभूळकर, शंकर मोरे, मीडिया प्रभारी म्हणून कृणाल रघाटाटे, कोषाध्यक्ष सागर मुंधडा, शहर सचिव पवन येरगुडे इत्यादी कार्यकर्त्यांची आ.समीर कुणावार यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.

यावेळी कार्यसम्राट आमदार समिर कुणावार यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे नव्याने नियुक्ती देण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत कोणत्याही अडचणीचे परिस्थितीत पाठिशी असल्याचे आश्वासन दिले, तळागाळातील लोकांच्या अडचणी सोडवून पक्षवाढीकरीता भाजयुमो पदाधिकऱ्यांनी तसेच सर्व युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन आ. कुणावार यांनी केले.

कार्यक्रमाचे वेळी आमदार समिर कुणावार,भाजयुमोचे प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, जेष्ठ पत्रकार किरण वैद्य, समाजसेवक रवि बुरीले, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष सोनू पांडे, समाजसेवक रोहित हांडे, स्टार प्रचारक राकेश शर्मा , गौरव तांबोळी, स्वप्निल शर्मा , अक्षय थुटे, तुषार येनोरकर, सनी बासनवार, राहुल दारुणकर, शुभम आष्टणकर, मोहम्मद रिमिज बाबू, योगेश जीकार, शंकर मोरे, राहुल नवघरे इत्यादी कार्यकर्ते व समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *