- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

हिंगणघाट समाचार : आ. समिर कुणावार यांचे उपस्थितीत रोहित हांडे यांचा शेकडो युवकांसह भाजयुमोत प्रवेश

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात भाजपाचा प्रभाव वाढल्यामुळे भाजपात सतत नवीन कार्यकर्त्यांचे इनकमिंग मोठया प्रमाणात सुरू आहे. आ. कुणावार यांचा जबरदस्त जनसंपर्क तसेच कार्यक्षेत्रातील विकासाचा झंझावात यामुळे प्रभावित होऊन अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात मोठया प्रमाणात सामील होत आहेत.

आज दि. ३० एप्रिल रोजी, कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रोहीत हांडे यांचेसह असंख्य युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता युवा मोर्चात प्रवेश घेतला. 

आ.समीर कुणावार यांचे नेतृत्व तसेच तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच विकासकामांना मिळणारी गती पाहून आ.समीर कुणावार यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

यावेळी प्रवेश करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांमध्ये रोहित हांडे, सचिन ढोकपांडे , सागर गायकवाड, दीक्षांत मोडक, ऋषभ गवळी, शुभम जवादे, अक्षय कुराडे, साहिल गवळी, अमित कामडी, संदीप कटारे, हिमांशू पंचनवार, निशांत हांडे, सुमित तेलहांडे, अक्षय देशपांडे, शुभम झोरे, अमित तेलहांडे, ओम तेलहांडे, मोहन काळे, सागर चंदनखेडे, निखिल काळे , अवधूत बावणे, अभिषेक बैस, अजय सिडाम, अखिल काळे, विजू मसराम, मंगल उईके, अनुज मसराम, मंथन मसराम इत्यादीचा समावेश होता. 

सदर पक्षप्रवेश कार्यक्रमाचे वेळी आमदार समिर कुणावार,भाजयुमोचे प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, जेष्ठ पत्रकार किरण वैद्य, समाजसेवक रवि बुरीले, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष सोनू पांडे, समाजसेवक रोहित हांडे, स्टार प्रचारक राकेश शर्मा , गौरव तांबोळी, स्वप्निल शर्मा, अक्षय थुटे, तुषार येनोरकर, सनी बासनवार, राहुल दारुणकर, शुभम आष्टणकर, मोहम्मद रिमिज बाबू, योगेश जीकार, शंकर मोरे, राहुल नवघरे इत्यादी कार्यकर्ते व समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *